प्रणिती शिंदे म्हणाल्या, "मी चूक केली की बरोबर हे मला माहित नाही !' 

 प्रणिती शिंदे म्हणाल्या, "मी चूक केली की बरोबर हे मला माहित नाही !' 

नागपूर : " मी चूक केली की बरोबर हे मला माहित नाही मात्र अधिवेशन सोडून मी तुम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधायला आले. तुमच्याकडून काहीतरी शिकायला मिळते म्हणून आले असे सांगताच सोलापूरच्या आमदार प्रणोती शिंदे यांचे टाळ्याच्या गजरात स्वागत करण्यात आले. 

निमित्त होते गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग ऍन्ड टेक्‍नॉलॉजीने आयोजित केलेल्या विदर्भ विद्यार्थी संसदेच्या उद्‌घाटन सोहळ्याचे. वसंतराव देशपांडे सभागृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिंदे म्हणाल्या, की स्मार्ट सिटी पेक्षा स्मार्ट व्हिलेजेस झाले पाहिजेत. कारण आज शहरांतील लोक पुढारलेले आहेत, असे आपण मानतो. पण खऱ्या अर्थाने आपण माघारत चाललो आहोत. 

कारण लहान सहान गोष्टींसाठीही आपण परावलंबी होत चाललो आहोत. काहीही शोधण्यासाठी, जाणून घेण्यासाठी आपल्याला स्मार्ट फोनची गरज पडू लागली आहे. निसर्गापासून आपण दुरावत चाललो आहो. याउलट खेड्यांतील लोक आजही आकाशाकडे बघून अचूक वेळ सांगतात. पाणी आणि माती पाहून पिकांचा अंदाज घेतात. अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या निसर्गाकडूनच मिळविल्या जातात. त्यामुळेच आपण माघारत चाललो आहोत. 

आज देशाला युवकांची गरज आहे. कारण विचित्र वातावरण झाले आहे. तळागाळातूनच नेतृत्व पुढे आले, हा इतिहास आहे. आपणच केंद्रबिंदू मानून युवकांना प्रत्येक क्षेत्रांत काम केले पाहिजे. खरा पुरुष तो आहे जो महीलांचे रक्षण करतो, तो नव्हे जो अत्याचार करतो.

नुकत्याच हिंगणघाट, सोलापूरमध्ये महिलावरील अत्याचाराच्या भयंकर घटना घडल्या. सोलापुरच्या प्रकरणात पिडीतेने सहा महीने पोलीसांत जाण्याची हिंमत गेली नाही. पण कुणीतरी तिला हिंमत देऊन पोलिस ठाण्यात नेले. तुम्ही सुद्धा हे काम केले पाहिजे. अन्यायाला वाचा फोडली पाहीजे असेही त्या म्हणाल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com