मी पक्षाकडे तिकीट मागितले नाही, मागणार नाही : बावनकुळे 

मी पक्षाकडे तिकीट मागितले नाही, मागणार नाही : बावनकुळे 

नागपूर : " मी पक्षाकडे तिकीट मागितले नाही, मागणार नाही. मात्र विधानपरीषदेच्या निवडणुकीसाठी जर पक्षाने आदेश दिला तर नक्की लढेन असे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. 

आजपर्यंत मी पाच निवडणुका लढलो. पण मी स्वतः कधीही पक्षाकडे उमेदवारी मागितली नाही. पक्षाने जी जबाबदारी दिली, ती नेहमीच स्वीकारली. विधानपरीषदेसाठी माझ्या नावाची चर्चा सुरु असल्याचे माध्यमांतूनच मला कळले असेही ते म्हणाले. 

मंत्री नितीन राऊत यांनी केलेली घोषणा सरकारने पूर्ण केल्यास सर्वप्रथम सरकारचे अभिनंदनही आम्हीच करू असे सांगून ते म्हणाले, की राऊत यांनी 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली. मात्र त्यानंतर अर्ध्या तासाच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज मोफत देण्यास असमर्थता दर्शविली. यावरुन कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. 

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कितपत काम करु देतील याबद्दलही शंकाच आहे. सपरंचांची थेट जनतेतून होणारी निवड प्रक्रिया या सरकारने बहुमताच्या जोरावर बंद केली. हे राज्यासाठी दुर्दैवी आहे. कारण सरपंचांची निवड थेट जनतेतून व्हावी, याच मताचे 48 हजार ग्रामपंचायतींच्या 90 टक्के सरपंच आहेत. कुणाशीची चर्चा न करता, विश्‍वासात न घेता हुकुमशाही पद्धतीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. 

हरभरा, सोयाबिन, कापुस यांसह शेतकऱ्यांचे अन्य पीक वाया गेले. पण सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. 15 हजार शेतकऱ्यांना केवळ दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी केली आहे. नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात घोषणा करुनही अद्याप शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालेला नाही. 

पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप हास्यास्पद 
समृद्धी महामार्गाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप हास्यास्पद आहे. त्यांच्या सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच पूर्वीच्या सरकारमध्ये "समृद्धी'ची जबाबदारी होती. त्यामुळे आपल्या सरकारमधील मंत्र्यांवरच ते अप्रत्यक्षपणे आरोप करीत असल्याचे अद्याप त्यांच्या लक्षात आलेले नसल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com