माझे आईवडील माळशिरसमध्ये राबले, मी इथलाच : राम सातपुते

माझे आईवडील माळशिरसमध्ये राबले, मी इथलाच : राम सातपुते

पुणे : माळशिरस तालुक्‍याशी माझे कष्टाचे नाते आहे. माझे आई-वडील इथल्या मातीत राबले. त्यामुळे पुढची पाच वर्षे नव्हे तर मी कायमचाच माळशिरसकर आहे, अशी भावना नवनिर्वाचित आमदार राम सातपुते यांनी व्यक्त केली.

माळशिरस तालुक्‍यातील भांबुर्डी गावात असलेल्या जुन्या झोपडीचा फोटो आमदार सातपुते यांनी ट्‌विट केल्यानंतर झोपडीत राहणाऱ्या एका उसतोडणी कामगाराच्या या आमदार मुलाची सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा सुरू झाली.

या पार्श्‍वभूमीवर "सरकारनामा'शी बोलताना आमदार सातपुते म्हणाले, "" सदाशिवनगरच्या शंकर सहकारी कारखान्यावर माझे आई-वडील ऊसतोडणी कामगार म्हणून काम करीत होते. ऊस तोडणीचा हंगाम संपल्यानंतर भांबुर्डी गावातील मदने यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करू लागले. त्यानंतर काही वर्षे गावाजळील वस्तीवर झोपडी बांधून आम्ही राहू लागलो. निवडणुकीच्या निमित्ताने या गावात मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे या पुढच्या काळात याच गावात राहण्याचा निर्णय मी घेतला आहे.''

आमदारकीच्या निमित्ताने अगदी कमी वयात माळशिरसकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. या संधीचे नक्कीच सोने मी केल्याशिवाय राहणार नाही. असा निर्धार आमदार सातपुते यांनी केला. ते म्हणाले, "अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत माळशिरसकरांनी मला साथ दिली आहे. पुढची पाच वर्षे सातत्याने मतदारसंघातील लोकांसाठी काम करणार आहे. तालुक्‍यातील पाणी प्रश्‍न, शेतकऱ्यांचे प्रश्‍न हा माझा अग्रक्रम राहणार आहे.''

दरम्यान, राज्यात सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पार्टी व शिवसेनेत कुरूघोडीचे राजकारण सुरू असताना नव्या मंत्रीमंडळात स्थान मिळविण्यासाठी आमदारांनी तयारी सुरू केली आहे. वयाच्या तिशीत माळशिरसमधून आमदार झालेल्या राम सातपुते यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्तता व्यक्त करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातून विजय देशुमख किंवा सुभाष देशमुख यांच्यापैकी एकाला निश्‍चितपणे संधी मिळणार आहे. जिल्ह्यातून मोहिते-पाटील यांना मंत्री करण्याचा निर्णय पूर्णत्वास गेला नाही तर तालुक्‍यातून आमदार सातपुते यांना राज्यमंत्रीपद मिळू शकेल, असे सांगण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com