i like to become cm jotiraditya shinde | Sarkarnama

मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल : ज्योतिरादित्य शिंदे 

वृत्तसंस्था
बुधवार, 12 डिसेंबर 2018

भोपाळ ; "मध्य प्रदेशाचा मुख्यमंत्री व्हायला मला आवडेल,'' असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.

 मध्य प्रदेशात कॉंग्रेसचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला असला तरी मुख्यमंत्री कोण होणार, यावरून पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. ज्येष्ठ नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. 

बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने कॉंग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर मध्य प्रदेशात त्यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला. मात्र, कॉंग्रेस नेते कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे समर्थकांकडून आपापल्या नेत्याच्या नावासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्यास सुरवात झाली आहे.

या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीने शिंदे यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. "तुम्हाला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, ""पक्षाने जर जबाबदारी सोपवली तर मी स्वतःला भाग्यवान समजेन.'' त्यांनी मायावती आणि अखिलेश यादव यांचेही पाठिंब्याबाबत आभार मानले.'' 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख