थोरात म्हणाले; मी आणि जयंतराव अडचणीतले प्रदेशाध्यक्ष

...
balasaheb-thorat-jayant-patil
balasaheb-thorat-jayant-patil

पुणे : राजकीयदृष्ट्या अडचणीत माझ्या आणि जयंत पाटलांकडे आपापल्या पक्षांच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आली. कठीण काळातील जबाबदारीची आम्ही चर्चाही करायचो; पुढे काय होईल ? हे खरेच ठाऊक नव्हते. पण आमचे पक्ष सत्तेत आले आणि दोघे मंत्री झालो, अशी मिश्‍किल टिप्पणी करीत राज्याचे महसूल मंत्री आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. त्यांनी थोरात-पाटील यांच्यातील समान राजकीय धागा उलगडला.  "गेली पाच वर्ष अवघड गेली असला तरी या पुढे चांगली कामे करू,' असा शब्दही थोरात यांनी या वेळी दिला.

"सकाळ माध्यम समूहा'ने तयार केलेल्या "अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र : रिअल इस्टेट पुणे' या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात थोरात यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांशी संवाद साधला. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, `सकाळ`चे संपादक-संचालक श्रीराम पवार, सीईओ उदय जाधव,  "क्रेडाई'चे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश मगर, राज्याचे अध्यक्ष राजीव पारेख आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, "" गौणखजिन उत्खन्नप्रकरणात काहीजणांना नाहक आणि काही ठिकाणी जादा दंड ठोठावल्याच्या तक्रारी आहेत. त्यात लक्ष घालून चुकीच्या धोरणांत बदल केले जातील. अशा घटनांमध्ये ज्या कोणाची चूक असेल ? त्यांच्यावर कारवाईदेखील होईल. यासंदर्भात मुंबईत स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली असून, तशी यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. ही प्रक्रिया "ऑनलाइन' झाल्यास व्यावसायिकांना त्रास होणार नाही. महापालिकांच्या पातळीवर हे शक्‍य नसेल तर महसूल खाते पुढाकार घेईल.''

पुण्यात मूलभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे देशातील सर्व भागातील व सर्व क्षेत्रातील व्यक्तींच्या आकर्षणाचे शहर पुणे बनले आहे. पुण्यातील बांधकामांची संख्या वाढत असून दर्जेदार बांधकामे करण्याचे श्रेय बांधकाम व्यावसायिकांचे आहे. गौण खनिज उत्खनन, मुद्रांक शुल्क तसेच बांधकाम व्यावसायिकांचे अन्य प्रलंबित  सोडवण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी व बांधकाम व्यावसायिकांची स्वतंत्र बैठक घेण्यात येईल. त्याचबरोबर रेडी रेकनरचे दर कमी करण्यासाठीही  प्रयत्न केले जातील, असे श्री. थोरात यांनी सांगितले.

जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, पुणे शहराची वाढ झपाट्याने होत असून शहराची कल्पकतेने वाढ होण्यात बांधकाम व्यावसायिकांचे मोलाचे योगदान आहे. सध्या नागरी वस्त्यांचे प्रमाण वाढत असून त्याप्रमाणात पाण्याचा वापर वाढत आहे. अशावेळी नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा. पाण्याच्या मर्यादित वापरावर उपाय म्हणून बांधकाम व्यावसायिकांनी घर खरेदीदारांना प्री-पेड मीटर बसवून द्यावे. त्याचबरोबर पाण्याचा पुनर्वापर होणे आवश्यक असून यासाठी क्रेडाई ने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करुन पाणी पुनर्वापराचे प्रमाण वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com