`चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाची वाट पाहत आहे'

विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्वाही दिली असून, आपलीही त्यादृष्टीने तयारी आहे. त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत.- एकनाथराव खडसे
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाची एकनाथराव खडसे वाट पाहत आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळण्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निर्णयाची एकनाथराव खडसे वाट पाहत आहेत.

जळगाव : राज्यसभेसाठी आपल्याला उमेदवारी दिल्याने एकाच घरातील दोन खासदार झाले असते. त्यामुळे पक्ष उमेदवारी देऊ शकणार नाही, याची आपल्याला माहिती होती. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेवर निवडीचे सूतोवाच केले आहे. त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे मत माजी मंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

खडसे आज मुंबईहून जळगावात आल्यानंतर येथील शिवरामनगरातील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की राज्यसभेबाबत एका घरात दोन खासदार असू शकत नाहीत. पक्ष तसा निर्णयही घेऊ शकणार नाही, याची आपल्याला माहिती होती. त्यामुळे राज्यसभेच्या उमेदवारीसंदर्भात आपला कोणताही प्रश्‍न नाही. मात्र, विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी देण्याबाबत पक्षाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ग्वाही दिली असून, आपलीही त्यादृष्टीने तयारी आहे. त्यामुळे आपण त्यांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. 

जिल्हा बॅंक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनल 
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीबाबत खडसे म्हणाले, की जिल्हा बॅंक आणि जिल्हा दूध संघात गेल्या वेळी सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून कामकाज करण्यात आले. ते अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे यापुढेही सहकार क्षेत्रातील काम सर्वपक्षीय असण्याची गरज आहे. आगामी जिल्हा बॅंक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलच असावे, असेच आपले मत आहे. त्या माध्यमातून चांगले कामकाज होऊ शकेल. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com