I am with NDA : Narayan Rane | Sarkarnama

मी एनडीए सोबतच राहणार :  नारायण राणे

वैदेही काणेकर
गुरुवार, 14 मार्च 2019

मी एनडीए सोबतच राहणार आहे, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई : मी एनडीए सोबतच राहणार आहे, असे नारायण राणे यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी "नारायण राणे आपलेच' असे विधान केल्यामुळे चर्चेला उधाण आले होते. तसेच नारायण राणे यांना कॉंग्रेस आघाडीत सहभागी करून घेण्याच्या बातम्याही येत होत्या.

या पार्श्‍वभूमीवर नारायण राणे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, " आमचा स्वाभिमानी पक्ष एनडीए सोबतच राहणार आहे. मला जे पाठिंबा देतील त्यांचा पाठिंबा मी स्वीकारीन. मला कोणाकडून अपेक्षा नाही. मी एनडीए सोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.''

आपण एनडीएमध्ये राहणार असाल तर सिंधूदूर्गमध्ये शिवसेनेने उमेदवार दिल्यास आपली भूमिका काय असेल असे विचारले असता श्री. राणे म्हणाले, " सिंधूदुर्गात शिवसेनेने उमेदवार दिला तरी स्वाभिमानी ही जागा लढविणार आहे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख