"मी जन्माने, कर्तव्याने, निष्ठेने हिंदू आहे, आणि हिंदू म्हणूनच मरणार : जितेंद्र आव्हाड

"राज्यात पहिल्यांदा मुंब्र्यात मशिदीला कुलूप लागलं.पहिल्यांदा एस आर पी बोलावली.मला तिथल्या हिंदू आणि मुस्लिम भागात आघाडी मिळते.मी जात धर्म न बघता लोकांच्यासाठी काम करतोय.
 "मी जन्माने, कर्तव्याने, निष्ठेने हिंदू आहे, आणि हिंदू म्हणूनच मरणार : जितेंद्र आव्हाड

पुणे-"मी जन्माने,कर्तव्याने, निष्ठेने हिंदू आहे, आणि हिंदू म्हणूनच मरणार आहे.मला कोणाकडून हिंदू असल्याचे प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही."असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यावर काल झालेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. काल आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली होती.

"मी सोलापूरचा पालकमंत्री म्हणून आलो. पंढरपूरला गेलो. प्रशासनाने मंदिर उघड ठेवलं होतं तरी मी आत गेलो नाही.जेव्हा सगळ्या लोकांना देवळं उघड होईल तेव्हाच मी आत जाईन. मी संत चोखा मेळा यांच्या समाधीच दर्शन घेतलं.त्यांच्या समाधीवर डोकं ठेवलं.आणि त्यांच्याजवळ मी विठ्ठलाला निरोप दिला,महाराष्ट्राला सावर म्हणून..'असे आव्हाड म्हणाले.

"मी हिंदू आहे.हिंदू म्हणून मरणार आहे.मी ध्येयाने हिंदू आहे.निष्ठेने हिंदू आहे.मला कोणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही."असे ते म्हणाले.

"राज्यात पहिल्यांदा मुंब्र्यात मशिदीला कुलूप लागलं.पहिल्यांदा एस आर पी बोलावली.मला तिथल्या हिंदू आणि मुस्लिम भागात आघाडी मिळते.मी जात धर्म न बघता लोकांच्यासाठी काम करतोय. रोज आम्ही 80 हजार लोकांना जेवण देतोय.राज्यात कुठेही नाहीत असे कम्युनिटी दवाखाने सुरू केले आहेत."असे त्यांनी सांगितले.

"मी नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केली म्हणून मला तू मुसलमान का होत नाही असे विचारले गेले.मी हिंदू आहे,निष्ठेने हिंदू आहे,कर्तव्याने हिंदू आहे. सत्ता बदलली की निष्ठा बदलणाऱ्यानी मला निष्ठा शिकवू नये."असं आव्हाड म्हणाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com