मी अजूनही फीट : हरिभाऊ बागडे

" मी अजूनही फीट आहे, विरोधकांना थकवू शकतो' असे म्हणत प्रचाराला लागलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडका सुरू केला आहे. सकाळी आठ ते रात्री आठ अशा बारा तासात अठरा गावांना भेटी आणि जाहीर सभा असा भरगच्च कार्यक्रम आखून ते प्रचारासाठी फिरत आहेत.
मी अजूनही फीट : हरिभाऊ बागडे

औरंगाबादः " मी अजूनही फीट आहे, विरोधकांना थकवू शकतो' असे म्हणत प्रचाराला लागलेल्या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी फुलंब्री विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धडका सुरू केला आहे. सकाळी आठ ते रात्री आठ अशा बारा तासात अठरा गावांना भेटी आणि जाहीर सभा असा भरगच्च कार्यक्रम आखून ते प्रचारासाठी फिरत आहेत.

फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून हरिभाऊ बागडे यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्‍न चिन्ह उपस्थित केले गेले होते. वाढत्या वयामुळे यावेळी त्यांना डावलले जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. पण या चर्चाच ठरल्या, पक्षाने मात्र बागडे यांच्यावरच विश्‍वास व्यक्त करत त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यानंतर बागडेंनी पहिली प्रतिक्रिया दिली तेव्हा, आपण अजूनही फीट आहोत, आणि विरोधकांना थकवण्याची, नमवण्याची आपल्यात धमक असल्याचे सांगितले होते.

मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाल्यानंतर कॉंग्रेसचे कल्याण काळे विरुध्द हरिभाऊ बागडे यांच्यात थेट लढत होणार आहे. पाच वर्षात केलेली विकासकामे आणि भविष्यात करावयाची कामे हे मुद्दे घेऊन बागडे यांनी प्रचाराचा धडका सुरू केला आहे. ते सकाळी आपल्या निवासस्थानातून निघाल्यावर रात्री उशीरा नियोजित गावांमधील प्रचार सभा संपवूनच परतत आहेत.

दरोजच्या प्रचार दौऱ्याचे नियोजन, वेळा आणि गावांची संख्या पाहता बागडे यांनी केलेले "अजूनही मी फीट आहे' हे वक्तव्य पटते. बागडे गुरूवारी मतदारसंघातील अठरा गावांना भेटी देऊन तिथे सभा घेणार आहेत. सकाळी आठ वाजता चौका येथून सुरू होणारा प्रचार दौरा रात्री आठ वाजता लाडसावंगी येथील जाहीर सभेने संपणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com