पहिला `भैय्या` मीच, अशोक पाटील निलंगेकरांचा दावा

लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र, मीच पहिला भैय्या आहे, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनी केला आहे.
Latur Bhaiyya
Latur Bhaiyya

लातूर: राजकारणात दादा, भैय्या, तात्या, अण्णा आदी नावांना मोठे महत्व व भाव  आहे. त्यात राजकारणातील पहिले दादा, तात्या व भैय्या कोण? असा प्रश्न येतोच.

लातूर जिल्ह्याच्या राजकारणात मात्र, मीच पहिला भैय्या आहे, असा दावा कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक पाटील निलंगेकर यांनी केला आहे. माझ्यानंतर आमदार अमित देशमुख हे दुसरे भैय्या तर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा तिसरा क्रम लागत असून सर्व भैय्यांत मीच सरस असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले.

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वारस असलेल्या अशोक पाटील यांनी निलंगा विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. बुधवारी (ता. १६) येथे कॉंग्रेसच्या प्रमुख नेते व पदाधिकाऱ्यांशिवाय स्वतंत्रपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यातील राजकारणात निलंगेकर घराणे तसेच निलंगा मतदारसंघाचे महत्व व इतिहास सांगितला. 

याशिवाय लातूर शहरातही निलंगा विधानसभा मतदारसंघातील निलंगा, शिरूर अनंतपाळ व देवणी तालुक्यातील पन्नास हजार लोक शिक्षण, व्यापार व अन्य कारणांमुळे वास्तव्यास असल्याचे सांगून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या शहर मतदारसंघातील निलंग्याची ताकदही दाखवून दिली. या लोकांना देशमुख यांच्या  कॉंग्रेसच्या पाठीमागे उभा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावांकडून डॉ. काळगेंचे प्रयत्न?

लातुरात अशोक पाटील निलंगेकर यांनी त्यांच्या कुटुंबांचे निकटवर्तीय डॉ. जगन्नाथ पाटील यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत निलंगेकर यांनी लातुरातील बहुतांश उद्योजक, व्यावसायिक व मातब्बर कार्यकर्ते निलंगा तालुक्यातील असल्याचे सांगितले. लातूरमधील निलंगा तालुक्यांतील रहिवाशांचे महत्व पुढे येत असतानाच लातूर लोकसभा मतदारसंघासाठी कॉंग्रेसकडून इच्छुक असलेले व निलंगा तालुक्यातील रहिवाशी डॉ. शिवाजी काळगे यांचे आगमन झाले. यामुळे डॉ. काळगे हे आपल्या गावाकडून म्हणजेच निलंगेकरांच्या माध्यमातून उमेदवारीसाठी प्रयत्न करत असल्याचे सर्वांना वाटून गेले. डॉ. काळगे यांनी पाच वर्षापूर्वी भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com