केवळ जनतेसाठी लढतोय :समाधान आवताडे 

..
Samadhan_20Awatade
Samadhan_20Awatade

मंगळवेढा : मतदारसंघात 35 वर्षापासून असलेल्या अनेक समस्यांच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी मी एक सक्षम उमेदवार आहे.  अशी भावना जनतेतून  झाल्यामुळे त्यांनीच मला या निवडणुकीत पक्षाने संधी देवो अगर न येवो पण दादा तुम्ही अपक्ष लढा या भूमिकेतून त्यांनी आग्रह केला .  केवळ जनतेसाठी लढतोय आणि जनतेच्या पाठबळावरच मी विधानसभेत जाणार , असा आशावाद अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी व्यक्त केला.

निवडणूकीसाठी मी का उभा आहे याबाबत आपली भुमिका सरकारनामाशी बोलताना समाधान अवताडे यांनी  स्पष्ट केली.ते म्हणाले,  35 वर्षाच्या काळात मतदारसंघाचा विकासाचा आलेख जेवढ्या पद्धतीने वाढायला हवा होता तेवढा वाढला नसल्यामुळे हा मतदारसंघ मागास राहिला आहे.  परंतु या मतदारसंघातून विकासाच्या दृष्टीने आपली भूमिका सक्षमपणे विधानसभेत मांडणारा नेता येथे हवाय . 

एखाद्यावर  टीका करून त्याची प्रतिमा हनन न करता संतनगरीचा लौकीक विधानसभेत मी कायम राखू शकतो.त्या दृष्टीने आपली  प्रतिमा लोकांतून तयार झाली आहे 
.

त्यामुळे  मतदारसंघांमध्ये लोकांचा आपल्याला प्रतिसाद गत निवडणुकीपेक्षा यंदा चांगला मिळाल्यामुळे आपला आत्मविश्वास आणखीन वाढला. त्यामुळे या मतदारसंघातील रखडलेल्या प्रश्नाची जबाबदारी भविष्यात निश्चितच आपल्यावर येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाटचाल चालू आहे आपल्यासाठी कार्यकर्त्यांनी देखील जीवाचे रान केले आहे .

तालुक्याच्या हक्काचे असलेले  उजनीचे पाणी देखील पूर्ण क्षेत्राला मिळत नाही . ते पूर्ण क्षेत्राला मिळवूनदेण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .  म्हैसाळ योजनेचे पाणी  दक्षिण भागातील वंचित गावांना  मिळवून देताना  उर्वरित गावांना देखील पाणी मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे . 


मंगळवेढा औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योगधंदे सुरू करण्यासाठी पुढाकार घेणार असून पंढरपूर मध्ये नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी प्रयत्न  करेन .  

जेणेकरून या भागात नवीन उद्योजक तयार होतील त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहे . मतदारसंघातील ग्रामीण भागात व वाडी-वस्तीवर रस्त्याचे निर्मिती करून व्यवस्थित वाहतूक व्यवस्था सुरळीत करणार आहे. 


  प्रत्येक गावात शुद्ध पाणी देण्याच्यादृष्टीने गावनिहाय फिल्टर पाण्याचे  नियोजन करून मंगळवेढ्यातील प्रलंबित असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लावणार आहे. उद्योजकांना उद्योजक बनण्यासाठी आपण स्वत प्रयत्नशील असून प्रलंबित असलेल्या संत नगरीला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे . 


शिवाय महात्मा बसवेश्वर, चोखोबा व कान्होपात्राचे स्मारकाचे रखडलेले काम होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.  शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करून कचरा मुक्त शहर निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहीन . 


अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात संत साहित्याचे अभ्यासक केंद्र निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहे.  मतदारसंघात ऊस द्राक्ष संशोधन केंद्र उभारणे माती परीक्षण केंद्र निर्माण करून जी, आय मानांकन मिळालेल्या ज्वारीला राष्ट्रीय पातळीवरचा ब्रँड निर्माण करण्यासाठी लक्ष घालणार आहे . 


 शिर्डी च्या धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून झोपडपट्टीच्या विकास करून महिला बचत गटांना सक्षम करून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.  उजनी व वीर पाण्याचे योग्य नियोजन करून त्या पाण्यासाठी पुढाकार घेताना चंद्रभागा नदीचे स्वच्छता व सुशोभिकरण करणे ,माण नदीला कायमस्वरूपी कालव्याचा दर्जा देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू. 


 प्रलंबित असलेला प्रश्न कृष्णा भिमा स्थिरीकरण अंतर्गत बारमाही पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मी  प्रयत्न करणार आहे.  या सर्व गोष्टी करण्यासाठी जनतेने आपल्याला उभा केले .

त्यामुळे अलीकडच्या काळात  मतदारसंघातील साखर कारखानदारीच्या माध्यमातून केलेले वचनपुर्ती, खाजगी कारखाना व सूतगिरणीच्या माध्यमातून केलेले बेरोजगारासाठी केलेली रोजगार निर्मिती यामुळे व स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकांनी दिलेले संधी यामुळे आत्मविश्वास वाढल्याने मतदारसंघात बदल हवा आहे.

तो बदल निश्चितच आपल्या रूपाने त्यांना मिळणार आहे मतदारसंघातील जनता पाठवणार आहे असल्याचा आशावाद उमेदवार यांनी व्यक्त केला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com