मी रडणारा नाही; लढणारा : अजित पवार

मी रडणारा नाही; लढणारा : अजित पवार

बारामती : मी रडणारा नाही, लढणारा आहे, असे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रचारदौऱ्यांची सुरवात केली.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पवार यांनी कण्हेरी (ता. बारामती) येथी शुभारंभाची सभा घेतली. त्यानंतर त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत बॅटिंग केली.

साताऱ्यामध्ये शरद पवारांनी लढावे म्हणून आमदार सांगता होते. त्यामुळे छत्रपती उदयनराजे भावनिक झाले. ते रडले. मीही परवा रडलो नाही. पण मी रडणारा नाही लढणारा आहे, असे आव्हान त्यांनी दिले. माझ्यावर एक गुन्हा दाखल आहे. तो मी निवडणूक प्रतिज्ञापत्रात लिहिला आहे. लोक त्याचं भांडवल करतील. त्याकडे लक्ष देऊ नका, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.

विजय शिवतारे हे पुरंदरमधून कसे निवडुन येतात, हे मी लोकसभा निवडणुकीच्या वेळी बोललो होतो. ते आजही माझ्या लक्षात आहे. त्यामुळे शिवतारेंच्या पराभवासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

एकनाथ खडसे यांचे पाच वर्षांपूर्वी काय स्थान होते? आज त्यांची अवस्था काय आहे? पंख छाटण्याचे काम भाजपने केलं आहे. प्रकाश मेहता, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, दिलीप कांबळे, एकनाथ खडसे यांचे तिकीट का कापले, याचे उत्तर भाजपने द्यावे. प्रदेशाध्यक्षांना कोल्हापूरमध्ये सुरक्षित मतदारसंघ नसल्याने ते कोथरूडमध्ये निवडणूक लढविण्यासाठी कोथरूडमध्ये आले, अशी टीका त्यांनी केली.

``सरकारने गेल्या पाच वर्षांत अडीच लाख कोटी कर्ज राज्यावर केले. नोकरभरती बंद केली. नवीन उद्योग राज्यात आले नाहीत. गरीब, वंचित घटकांना सरकार विसरले आहे.  जलयुक्त शिवार कुठं गेला, का नाही शेततळी दिली, असे प्रश्न त्यांनी विचारले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com