बाहेर आक्रमक असलो तरी घरात शांतच : बच्चू कडू - I always keep silence at home : kadu | Politics Marathi News - Sarkarnama

बाहेर आक्रमक असलो तरी घरात शांतच : बच्चू कडू

उमेश घोंगडे
रविवार, 1 जुलै 2018

"सरकारनामा'शी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना आमदार बच्चू कडू यांनी विविध प्रश्‍नांवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. प्रहार संघटनेच्या माध्यमातून सुरू असलेले दिव्यांग लोकांसाठीचे काम, त्यांच्या अचलपूर मतदारसंघातील काम आणि राज्यातील एकूण राजकीय परिस्थितीवर त्यांनी मते मांडली.

पुणे : जनतेचे काम करताना कोणत्याही आधिकाऱ्याला वा कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची आपली अजिबात इच्छा नसते. उलट त्यांना मारहाण केल्यानंतर मला वाईट वाटते. मात्र सामान्यांची कामे अडविणारे असे आधिकारीच मारहाणीची वेळ आणतात, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू कडू यांनी "सरकारनामा'शी बोलताना सांगितले. बाहेर आक्रमक असलो तरी घरात शांतच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार कडू म्हटले की विविध प्रकारची आंदोलने व न ऐकणाऱ्या आधिकाऱ्यांना थेट मारहाण असे चित्र समोर येते. मंत्रालयातील आधिकाऱ्यांनी मारहाणीची काही प्रकरणे गेल्या काही वर्षात बरीच चर्चेची ठरली होती. काही प्रकरणात त्यांना अटकदेखील करण्यात आली होती.

या संदर्भात बोलताना कडू म्हणाले, "" सर्वसामान्यांची कामे घेऊन विविध सरकारी कार्यालयात जातो. मात्र कामे मार्गी लावण्यापेक्षा तांत्रिक अडचणी सांगून ती टाळण्याकडे आधिकारी व कर्मचाऱ्यांचा कल असतो. या तांत्रिककतेत सामान्य माणसाची होरपळ होते. आधिाकऱ्यांना याची कसलीच जाणीव नसते. अगदी मंत्रालयातही मी असाच अनुभव घेतला आहे. त्यामुळे अशा आधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मारहाणीची वेळ येते.'' 

सार्वजनिक जीवनात अत्यंत आक्रमकपणे वावरणारे आमदार कडू घरात कसे असतात याबद्दल विचारले असता. घरात मी अगदी शांत असतो असे उत्तर देत सार्वजनिक जीवनात वावरताना मात्र परिस्थिती पाहून चीड येते आणि मग आपोआपच आक्रमता येते, असे आमदार कडू यांनी सांगितले. ही आक्रमकता घरात मात्र दाखवत नाही. तसे केल्यास अवघडच होईल, असे त्यांनीही हसत सांगितले.

सर्वसामान्य माणूस कार्यालयात गेल्यानंतर आधिकारी वा कर्मचाऱ्यांनी नियमात बसणारी कामे तत्काळ करून द्यावीत, अशी आपली साधी अपेक्षा आहे. या भूमिकेतून सरकारी आधिकाऱ्यांनी काम केल्यास कोणताही प्रश्‍नच उद्भवणार नाही, असे त्यांनी सांगितले.

त्यांनी आपल्या लग्नाचा किस्साही या वेळी सांगितला. या लग्नात आहेर स्वीकारण्याऐवजी आपण अपंगांना सायकल दिल्या होत्या. तसेच लग्न जमविण्यासाठी फार मुली न पाहण्याचाही निश्चय केला होता.
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख