ख्रिसमसपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार : दलवाई

 ख्रिसमसपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार : दलवाई

औरंगाबाद : राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार पाच वर्षे नव्हे तर 25 वर्षे टिकेल, असा दावा कॉंग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी आज येथे केला. ख्रिसमस पूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असा दावाही त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना दलवाई म्हणाले, की भाजपने राज्यातील अनेक उद्योग गुजरातला पळविले. राज्य देशात 13 व्या क्रमांकावर फेकले गेले. राज्याला पुन्हा एक नंबरवर आणण्यासाठी आघाडी केली आहे, त्यामुळे पुढील 25 वर्षे आघाडी सरकार सत्तेत असेल. 

आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न बाजूला ठेवून भाजप सरकार राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करून देशात दुही माजविण्याचे काम करत आहे. त्यांचा या देशाला पाकिस्तान करण्याचा प्रयत्न आहे. घटनेला हात लावाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही दलवाई यांनी दिला. राज्यात हा कायदा लागू होणार नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

पत्रकार परिषदेत दलवाई पुढे म्हणाले, की निश्‍चलीकरण, जीएसटीमुळे देशातील उद्योग बंद पडत आहेत. दोन कोटी लोकांची नोकरी गेली. देश आर्थिक संकटात असताना, त्यातून बाहेर पडण्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याची जबरदस्तीने अंमलबजावणी केली जात आहे. या कायद्याला आमचा विरोध नाही; मात्र विशिष्ट एका समाजाला बाजूला ठेवून व त्रास देण्यासाठी कायदा लागू केला जात आहे. त्यामुळे देशभरात कायद्याच्या विरोधात जनक्षोभ उसळला आहे. ख्रिश्‍चन समाजाला सोबत घेता मग मुस्लिम समाजाला का टाळता ? असा प्रश्‍न दलवाई यांनी केला. पाकिस्तानात अल्पसंख्याक समाजाचा कसा छळ होतो, याचे दाखले दिले जातात. त्याप्रमाणेच आता तुम्ही देशातील गोरगरिबांना त्रास देणार आहात का ? असे सांगून दलवाई यांनी देशाला पाकिस्तान करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप केला. 

आसाममध्ये एनआरसी लागू झाल्यानंतर 19 लाख लोकांकडे कागदपत्रे नसल्याचे आढळून आले. त्यातील 12 लाख हिंदू, पाच लाख मुस्लिम तर दोन लाख उर्वरित समाजाचे लोक आहेत. अनेक गोरगरिबांकडे स्वतःचे रेशनकार्डही नसते, ते पुरावे कुठून देणार ? असेही दलवाई म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतली असून, हा कायदा राज्यात लागू होणार नाही, असा दावा त्यांनी केला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com