नेहरू यांच्यासमोर मोदी, शहा काहीच नाहीत - हुसेन दलवाई

दलवाई म्हणाले, तुम्ही आम्हाला कशाचे पुरावे मागता ? देश तुमच्या बापाचा आहे का ? ज्या जनतेने सत्ता दिली तीच जनता एकेदिवशी सत्तेवरून खाली उतरवतील. त्यामुळे जास्त मस्ती करू नका, योगी आदित्यनाथ हे तर मच्छर आहेत. हिंदू राष्ट्रामुळेच त्यावेळी पाकिस्तानची मागणी पुढे आली; मात्र मी पाकिस्तानचे समर्थन करणार नाही.
नेहरू यांच्यासमोर मोदी, शहा काहीच नाहीत - हुसेन दलवाई

औरंगाबाद : "खोटे बोला आणि द्वेष करा, हेच संस्कार भाजपच्या नेत्यांना संघाच्या शाखेतून दिले जातात. महात्मा गांधी, पंडित नेहरू यांनी मोठ्या कष्टाने हा देश घडवला. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा त्यांच्या समोर काहीच नाही' अशी टिका कॉंग्रेसचे खासदार हुसने दलवाई यांनी केली आहे. औरंगाबाद येथील मौलाना आझाद विचारमंचतर्फे आयोजित तीनदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत दलवाई मार्गदर्शन करत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून हल्ला चढवला. 

दलवाई म्हणाले, तुम्ही आम्हाला कशाचे पुरावे मागता ? देश तुमच्या बापाचा आहे का ? ज्या जनतेने सत्ता दिली तीच जनता एकेदिवशी सत्तेवरून खाली उतरवतील. त्यामुळे जास्त मस्ती करू नका, योगी आदित्यनाथ हे तर मच्छर आहेत. हिंदू राष्ट्रामुळेच त्यावेळी पाकिस्तानची मागणी पुढे आली; मात्र मी पाकिस्तानचे समर्थन करणार नाही. भाजपची सुरवातीपासूनची विचारधारा हिंदू राष्ट्राचीच आहे. फक्त तीन टक्के लोकांसाठी यांना देश हिंदू राष्ट्र करायचा आहे. मग मुस्लिम, ख्रिश्‍चन यांना समुद्रात बुडवायचे आहे का? आम्हाला पुरावे मागून पाकिस्तानात पाठवाल मग तुम्ही कुठे जाणार? असा सवालही दलवाई यांनी केला. 

नेहरू, इंदिरा गांधी यांनी जनतेसाठी अनेक निर्णय मागे घेतले; मात्र मोदी, शहा माघार घ्यायला तयार नाहीत. देशभरात आंदोलन पेटले; पण कोणी साधा दगडदेखील उचलला नाही. कारण आम्ही महात्मा गांधी, मौलाना आझाद यांच्या विचाराला मानणारे आहोत. तुम्हाला देशातील जनतेने सत्ता दिली आहे. तुमच्या शाखेने नव्हे. त्यामुळे जास्त मस्ती करू नका, सत्तेतून खाली उतरविण्याची ताकद जनतेमध्येच आहे असा इशाराही त्यांनी दिला. 
मोदींनी नेहरूंचे जॅकेटही चोरले.. 
मोदी जॅकेटवरूनही दलवाई संतप्त झाले. कसले मोदी जॅकेट ? हे तर पंडित नेहरू यांचे जॅकेट आहे. मोदींनीच नेहरू जॅकेट चोरल्याचा टोला देखील दलवाई यांनी यावेळी लगावला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com