husband of srapanch murdered in baramati | Sarkarnama

छेड का काढतो, असे विचारल्याने सरपंचाच्या पतीचा खून

सोमनाथ भिले
बुधवार, 15 जानेवारी 2020

डोर्लेवाड : महिलांची छेडछाड का करतो याचा जाब विचारल्याच्या रागातून सोनगाव (ता.बारामती) ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज आबासाहेब थोरात (वय ५०) यांचा येथील एकाने तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करत खून केला.

येथील सोनेश्वर मंदिर परिसरात बुधवारी (ता१५ ) रोजी दुपारी दोनच्या सुमारास  ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने गावातील महिला सोनेश्वर मंदिरात ओवासण्यासाठी जमा झाल्या होत्या. यावेळी तेथे काही तरुण उभे होते त्यापैकी एकजण महिलांची छेडछाड करत होता.

सरपंच जयश्री थोरात यांचे पती युवराज त्याठिकाणी होते. त्यांनी हे दृष्य पाहिल्यानंतर  त्याला याचा जाब विचारला. त्यावरून चिडून जावून त्याने त्यांच्यावर सपासप वार केले. त्यात थोरात हे जागीच ठार झाले. दरम्यान या घटनेनंतर गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून थोरात  यांचा मृतदेह  शवविच्छेदन करण्यासाठी बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात आणण्यात आल्यानंतर त्याठिकाणी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख