हुसेन दलवाई म्हणतात, अशोक चव्हाणांचे माहिती नाही पण .. 

राज्यात युतीचे सरकार येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू असतांना मीच शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात येणार असे भाकित केले होते. केंद्रातील नेत्यांची समजूत काढून त्यांना शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार करण्याच्या प्रयत्नांना यश आले.
hussain dalwai
hussain dalwai

औरंगाबादः भाजपला रोखण्यासाठी सत्तेत सहभागी व्हा असा मुस्लिम समाजाचाही आग्रह होता असे विधान सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक  चव्हाण यांनी नुकतेच केले. अशोक चव्हाण काय म्हणाले मला माहित नाही, पण राज्यात महाविकास आघाडी तयार व्हावी यासाठी मीच पुढाकार घेतला होता,  असा दावा कॉंग्रेस खासदार हुसेन दलवाई यांनी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलतांना केला.

शिवसेना-राष्ट्रवादी सोबत सत्तेत का गेलो याचे अनेक दावे कॉंग्रेसच्या नेत्यांकडून केले जात आहेत. अशोक चव्हाण यांनी नुकतेच नांदेड येथे मुस्लिमांच्या इच्छेमुळे सत्तेत गेल्याचा दावा केला होता. परंतु चव्हाण यांचा हा दावा त्यांच्याच पक्षाचे राज्यसभेतील खासदार हुसेन दलवाई यांनी फेटाळून लावला आहे.

औरंगाबादेत पत्रकरांशी बोलतांना दलवाई म्हणाले, राज्यात महाविकास आघाडी करण्यासाठी मी सुरवातीपासूनच पुढाकार घेतला होता. शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांमधील हिंदुत्वाचा फरक देखील कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना समजावून सांगितला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याबद्दल केंद्रातील कॉंग्रेस नेत्यांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यात देखील महत्वाची भूमिका बजावली.

शिवसेनेसोबत सत्तेत गेल्यास त्याचे दुरगामी परिणाम काय होतील, मुस्लिम समाज या नव्या राजकीय समीकरणाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहिल या बाबत सोनिया गांधी यांच्या मनात अनेक प्रश्‍न आणि शंका होत्या. मुस्लिम समाजाचे म्हणणे ऐकूण घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात मला यश आल्याचे दलवाई यांनी सांगितले.

शिवसेनेने नेहमीच कॉंग्रेसला मदत केली..

महाराष्ट्रासह उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान, ओरिसा, हैदराबाद, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातून भाजपला रोखण्यासाठी शक्‍य ते करा असे फोन आले. त्यानंतर आपण सोनिया गांधी यांना पत्र लिहले होते. विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर लगेच शिवसेनेसोबत आघाडी करण्या बाबतची इच्छा मी व्यक्त केली होती असेही दलवाई यांनी सांगितले.

राज्यात युतीचे सरकार येणार अशी चर्चा सर्वत्र सुरू असतांना मीच शिवसेना, कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात येणार असे भाकित केले होते. केंद्रातील नेत्यांची समजूत काढून त्यांना शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार करण्याच्या प्रयत्नांना यश आले.

पण त्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आरएसएसवर अनेकदा केलेली टिका, वेळोवेळी कॉंग्रेसला केलेली मदत, आणीबाणीचे समर्थन करत बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधींना दिलेला पाठिंबा, अंतुलेंच्या नेतृत्वातील सरकारला शिवसेनेने दिलेली साथ, प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपती करतांना मराठीच्या मुद्यावर बाळासाहेबांनी दिलेला पाठिंबा या सगळ्या गोष्टी पत्राच्या माध्यमातून कॉंग्रेस नेत्यांच्या मी निर्दशनास आणून  दिल्या.

या पत्राचा परिणाम म्हणूनच राज्यात महाविकास आघाडी तयार झाली आणि आज सत्तेत आहे. मुसलमानांनी सांगितल्यामुळे आम्ही शिवसेनेबरोबर गेलो हे अशोक चव्हाण यांचे म्हणणे तितकेसे बरोबर नसल्याचेही हुसेन दलवाई यांनी यावेळी स्पष्ट केले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com