शंभर वर्षाच्या सखुबाईंनी केले आतापर्यंत चौदा विधानसभांसाठी मतदान

वयाचे शतक गाटलेल्या सखुबाई नामदेव चुंभळे यांनी आज चौदाव्यांदा मतदान केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून झालेल्या सर्व चौदा विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी मतदान केले आहे. त्यामुळे त्या मतदानाला गेल्यावर नव्या पिढीच्या मतदारांसाठी तो कुतुहलाचा विषय ठरल्या.
Hundred Year Old Lady Voting in Nashik
Hundred Year Old Lady Voting in Nashik

नाशिक : वयाचे शतक गाटलेल्या सखुबाई नामदेव चुंभळे यांनी आज चौदाव्यांदा मतदान केले. महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यापासून झालेल्या सर्व चौदा विधानसभा निवडणुकांसाठी त्यांनी मतदान केले आहे. त्यामुळे त्या मतदानाला गेल्यावर नव्या पिढीच्या मतदारांसाठी तो कुतुहलाचा विषय ठरल्या.

देशात महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच १९६० साली विधान सभेसाठी सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. या पहिल्या निवडणुकीपासून ते आज (ता. २१) झालेल्या चौदाव्या विधानसभा निवडणुकीत देवळाली विधानसभा मतदारसंघातून गौळाणे (ता. नाशिक) येथील सखुबाई नामदेव चुंभळे या आजीबाईंनी मतदानाचा हक्क बजावला. सखुबाई यांना सात मुलगे, तीन मुली आहेत. त्यांच्या मोठा मुलगा तुकाराम यांचे वय ८० वर्षे आहे. त्यांचा सर्वात लहान नातु ३७ वर्षांचा तर मोठा पणतु २९ वर्षाचा तर सर्वात लहान पणतु ३ वर्षांचा आहे.

विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यांनी मतदान केले होते. त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत मतदान केले. आज त्यांनी गौळाने जिल्हा परिषध मतदान केंद्रात मतदान केले. ''आजवर ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंतच्या अनेक निवडणुका झाल्या त्या आठवत नाहीत. मात्र विधानसभेच्या सर्व चौदा निवडणुकीत मी मतादन केले आहे. आज मला माझा नातु मतदानाला घेऊन आला होता. मतदान केल्यावर लोक भेटतात. विचारपुस करतात. अनेकांना माझे वय समजल्यावर ते तोंडात बोट घालतात. कारण मी व्यवस्थित आहे. उत्तम आरोग्यामुळे रोजचे कामकाज मी स्वतःच करते. शेतावर जाते. मळ्यात फिरते,'' असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com