शिवसेना काय आहे हे जवळ आल्याशिवाय मुसलमानांना कसे कळणार ? : एकनाथ शिंदे 

शिवसेना काय आहे हे जवळ आल्याशिवाय मुसलमानांना कसे कळणार ? : एकनाथ शिंदे 

ठाणे: "आधी काही जण मुस्लमानांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका म्हणून घाबरवत होते. मात्र जो पर्यंत तुम्ही जवळ येणार नाही तो पर्यंत तुम्हाला शिवसेना काय आहे, हे समजणार कसे ? असा सवाल शिवसेनेचे नेते आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

नागरीकत्व सुधारणा कायद्याबाबत अद्यापही सुस्पष्टता नाही. त्यामुळे राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या बांधवांनी घाबरविण्याची गरज नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. त्यामुळे राज्यात त्या अनुषगांने डिटेन्शन सेंटरही उभारु देणार नसल्याचेही ते म्हणाले. 

शिवाय इतर मंडळी मुस्लीम बांधवांना शिवसेनेच्या जवळ जाऊ नका असे सांगत होती. मात्र, जो र्पयत तुम्ही जवळ येणार नाहीत, तो र्पयत शिवसेना काय आहे, हे तुम्हाला समजणार कसे असेही त्यांनी यावेळी सांगत, आम्ही तुमच्या सोबत होतो आणि आजही आहोत असे स्पष्ट केले. 

नागरीकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात ठाण्यातील मुस्लीम बांधव हे येत्या काही दिवसात मोर्चा काढणार आहेत. परंतु या मोर्चाच्या अनुषंगाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिंदे यांच्या मध्यस्तीने शनिवारी ठाण्यात रात्री एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत शिंदे यांनी कोणालाही येथे घाबरुन जाण्याची गरज नसल्याचे सांगितले. 

या राज्यात कोणत्याही धर्माच्या, जातीच्या व्यक्तीला भय वाटणार नाही, असा निर्णय करून हे सरकार बनले आहे. त्यामुळे ज्या दिवशी या कायदा मंजुर करण्यात आला, त्याच दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही जाती, धर्माच्या लोकांना त्रस होणार नाही, याचे आश्वासन दिले आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com