तुकाराम मुंडे तर नागपुरात आले; आता देवेंद्र फडणवीस काय करणार?

तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त असतांना त्यांनी महापालिकेच्या कामाला शिस्त आणत कोट्यावधी रुपयांची बचत केली. मात्र भाजप नगरसेवकांना ते आवडले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक त्यांची बदली केली. आता मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या होम माहापालिका नागपूरचे आयुक्त झाले आहेत. त्यामुळे भाजपने नाशिकला दिलेला त्रास अन्‌ फडणवीसांनी केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार का? याची राज्यभर चर्चा सुरु आहे.
तुकाराम मुंडे आणि देवेंद्र फडणवीस
तुकाराम मुंडे आणि देवेंद्र फडणवीस

नाशिक - तुकाराम मुंडे नाशिक महापालिकेचे आयुक्त असतांना त्यांनी महापालिकेच्या कामाला शिस्त आणत कोट्यावधी रुपयांची बचत केली. मात्र भाजप नगरसेवकांना ते आवडले नाही. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक त्यांची बदली केली. आता मुंडे देवेंद्र फडणवीस यांच्या होम माहापालिका नागपूरचे आयुक्त झाले आहेत. त्यामुळे भाजपने नाशिकला दिलेला त्रास अन्‌ फडणवीसांनी केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होणार का? याची राज्यभर चर्चा सुरु आहे.

नाशिक महापालिकेला अलिकडच्या काळात शिस्त लावणाऱ्या आयुक्तांत के. बी. भोगे आणि तुकाराम मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. नाशिकला स्मार्ट सिटी, मेट्रो व महसुलवाढीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तुकाराम मुंडे यांची नाशिकला नियुक्ती केली होती. मुंडे आयुक्त झाल्यावर त्यांनी नवी मुंबईत सुरु केलेला "वॉक वीथ कमिशनर' उपक्रम नाशिकमध्ये सुरु केला होता. नागरीकांचा त्याला मोठा प्रतिसाद मिळायचा. दिर्घकाळ प्रलंबीत राहिलेली नागीरकांची कामे तात्काळ होत होते. प्रशासनावर एव्हढी पकड होती की बेशीस्त कर्मचारी, अधिकारी अगदी सरळ झाले होते. 

नगरसेवकांचा कामकाजातील हस्तक्षेप बंद करण्याबरोबरच कोणत्याही नेत्याचे नियमबाह्य काम होत नव्हते. एरव्ही अदृष्य असणारे सफाई क्रमाचारी पहाटेच रस्त्यावर काम करतांना दिसत होते. मात्र भाजपच्या नगरसेवकांना हे पसंत पडले नाही. नगरसेवक, शहरातील आमदारांनी आयुक्त मुंडे यांच्या विरोधात मोहिम उघडली. त्यातूनच मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रालयात बदली केली. तेथेही संबंधित मंत्र्यांनी त्यांना कार्यभार न देता ताटकळत ठेवले होते.

या सर्व राजकीय त्रासांनतर देखील शिस्तबध्द मुंडे यांनी याबाबत तक्रार केली नव्हती. मात्र आता त्यांची बदली थेट देवेंद्र फडणवीस व भाजपची एकहाती सत्ता असलेल्या नागपुर महापालिकेच्या आयुक्तपदी झाली आहे. या शहरातील मेट्रो, महापालिकेच्या कामकाजासह हिवाळी अधिवेशनात विविध मंत्र्यांनी तक्रारी केल्या होत्या. याआधी स्वतः देवेंद्र फडणवीसच राज्याचे प्रमुख होते. त्यामुळे त्याचा फारसा गाजावाजा होऊ शकला नाही असे बोलले जाते. 

आता खुद्द तुकाराम मुंडे यांच्या हाती महापालिकेची सुत्रे गेली आहेत. राज्यात सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचे नवे सरकार सत्तेत आले आहे. या सरकारवर फडणवीस सातत्याने टिका करीत आहेत. या राजकीय बुद्धीबळात मुंडेंच्या निमित्ताने विरोधकांचा वजीरच अडचणीत येईल अशी ही खेळी असल्याची चर्चा आहे. 

स्वतः तुकाराम मुंडे यांना नाशिक महापालिकेत भाजपच्या राजकीय नेत्यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्याची परतफेड होते की काय याची सध्या जोरात चर्चा आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com