how to fight bjp | Sarkarnama

पुढील काळात भाजपचा मुकाबला कसा करायचा? 

शाम देऊलकर 
बुधवार, 1 मार्च 2017

भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच आपला क्रमांक एकचा राजकीय शत्रू असणार आहे, याची पुरेपुर जाणीव या पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांना झाली आहे. त्यामुळेच भाजपवाल्यांच्या शह-काटशहाच्या राजकारणाला कसे उत्तर द्यायचे, या रणनीतीविषयी शाखा-शाखांमध्ये आतापासूनच खल सुरू झाला आहे. 

मुंबई : भविष्यातील प्रत्येक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हाच आपला क्रमांक एकचा राजकीय शत्रू असणार आहे, याची पुरेपुर जाणीव या पालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसैनिकांना झाली आहे. त्यामुळेच भाजपवाल्यांच्या शह-काटशहाच्या राजकारणाला कसे उत्तर द्यायचे, या रणनीतीविषयी शाखा-शाखांमध्ये आतापासूनच खल सुरू झाला आहे. 

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना क्रमांक एकचा पक्ष म्हणुन समोर आला आहे. परंतु, भारतीय जनता पक्षानेही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत तब्बल अडीचपट जागा जास्त निवडून आणल्याने सेनेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. आता यापुढील काळात कॉंग्रेस व इतर पक्षांच्या तुलनेत भाजपशीच झगडावे लागेल, याची जाणीव सैनिकांना झाल्यामुळे शिवसैनिकांचे दुसरे घर समजल्या जाणाऱ्या शाखा-शाखांमध्ये भाजपविरोधाच्या चर्चा अजुनही थांबलेल्या नाहीत. भाजपचे सेनेवरील भविष्यातील आक्रमण हे कॉंग्रेसपेक्षा प्रखर असण्याची शक्‍यता असल्याने सेनेचे आक्रमक कार्यकर्ते समजले जाणारे शिवसैनिक हे आतापासूनच तयारीला लागले आहेत. भाजप पक्ष वाढवण्यापासून ते पक्ष कार्यकर्ते विविध आमिषे दाखवून पळवण्यापर्यंतच्या सर्व मार्गांचा अवलंब करत असल्याने जाणत्या शिवसैनिकांची चिंता वाढली आहे. सेनेतील नेतेमंडळी आता महापौरपदाच्या लढाईत गुंतली असली तरी सैनिकांनी आपल्या पातळीवर भाजपच्या भुलभुलैयाला उत्तर कसे द्यायचे, याबाबत विचारविनिमय सुरू केल्याचे कळते. 

कार्यकर्ता म्हणतो..... 
आम्ही मुंबईत एक नंबरवर आहोत, याचा आनंद आहे. परंतु, भाजपचे भविष्यातील आव्हान आम्हाला पेलायचे आहे, याची जाणीवही सर्व शिवसैनिकांना आहे. मराठी मतदारांबरोबरच अमराठी मतदारांनाही आम्हांला आपलेसे करावे लागेल, त्याबाबतीत पक्षप्रमुखांनी काही वर्षांपुर्वी राबवलेल्या "मी मुंबईकर' सारख्या चळवळींना उर्जितावस्था आणावी लागेल. भाजपचे आव्हान स्विकारण्यासाठी आम्ही तयार आहोत. 
-मंगेश वरवडेकर, शिवसैनिक 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख