....अन महाजनादेश यात्रा गुरुकुंजातून निघेल असे ठरले! (व्हिडिओ)

नवमहाराष्ट्राचे निर्माण ही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेशयात्रेची विचारधारा.गेल्या पाच वर्षात काय केले ,त्यातले काय साधले ते सांगत पुढच्या पाच वर्षांसाठी आशीर्वाद द्या, असा संवाद साधायला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचे ठरवले अन महाराष्ट्राचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी या कल्पनेला होकार दिला.
....अन महाजनादेश यात्रा गुरुकुंजातून निघेल असे ठरले! (व्हिडिओ)

मुंबई : नवमहाराष्ट्राचे निर्माण ही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेशयात्रेची विचारधारा.गेल्या पाच वर्षात काय केले ,त्यातले काय साधले ते सांगत पुढच्या पाच वर्षांसाठी आशीर्वाद द्या, असा संवाद साधायला मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेशी थेट संवाद साधण्याचे ठरवले अन महाराष्ट्राचे संघटनमंत्री विजयराव पुराणिक यांनी या कल्पनेला होकार दिला.

मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष सचिव निधी कामदार आणि श्रीकांत भारतीय यांच्या समवेत ही कल्पना विस्ताराने चर्चेला आली.भाजप संघटनेत वर्षानुवर्षे काम करणारे, प्रसिध्दीच्या झोतास सदैव टाळणारे संजय फांजे या महाराष्ट्राची माहिती असलेल्या कार्यकर्त्यावर मार्ग ठरवण्याची जबाबदारी फडणवीस आणि पुराणिकांनी एकमताने सोपवली होती. फडणवीस विदर्भातून यात्रेला प्रारंभ करतील हेही जवळपास निश्‍चित होते. प्रारंभबिंदू कुठे असावा यावर विचार सुरू झाला. रामटेक हे उपराजधानीला लगटून उभे असलेले स्थान हा पर्याय पुन:पुन्हा समोर येत होता.

आपण राज्यातील युवकांना रोजगार मिळावा, शेतात पाणी खेळावे,गावे स्वच्छ रहावीत यावर भर देणार आहोत याचे स्मरण करत नवी नावे समोर आणावीत असे ठरले. खेडयापाड्‌यात जागृती पसरवणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंज मोझरीतून सुरू करू या, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीचे सूत्र ग्रामगीतेत आहे ना, असे मुख्यमंत्री म्हणताच हे स्थळ निश्‍चित झाल्यात जमा झाले. फडणवीसांच्या कल्पनाशक्‍तीला दादही दिली गेली ,पण त्यांच्या सुरक्षिततेचा मुददा होताच. त्यामुळे सल्लामसलत आवश्‍यक होती. मोझरी ज्या अमरावती जिल्हयात आहे तो श्रीकांत भारतीय यांचाही जिल्हा. त्यांनी यंत्रणेशी संपर्क साधला अन संजय फांजे यांनी स्थळ निश्‍चित केले.

नंदूरबार या आदिवासी टप्प्यात पहिल्या चरणाचा शेवट करायचा ठरले. यात्रा समाप्ती देखील सामाजिक आशय असणाऱ्या ठिकाणी व्हावी असा निश्‍चय झाला अन मग काळाराम मंदिर नाशिकची निवड झाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांची पार्श्‍वभूमी, कुंभमेळ्याचे स्थान असे कितीतरी आयाम.अर्थात त्याला वेळ आहे. सामाजिक परिवर्तनाचे मोल ठसवून सांगण्यासाठी गुरूकुंज मोझरीची फडणवीस यांनी केलेली निवड महत्वाची आहे. हा भाग येतो कॉंग्रेसच्या फायरब्रॅंड नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात. आजा महाजनादेश यात्रेतल्या आरंभस्थळी तीन महिन्यांनी भाजपचा आमदार निवडून येतो काय ते पहायचे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com