दहशतवाद पसरविणाऱ्या देशाशी आम्ही कसे बोलू ? :जयशंकर

दहशतवाद पसरविणाऱ्या देशाशी आम्ही कसे बोलू ? :जयशंकर

न्यूयॉर्क : आमच्यावर दबाव आणण्यासाठी दहशतवाद हेच अधिकृत धोरण राबवत असलेल्या शेजाऱ्याबरोबर आम्ही चर्चा करू शकत नाही, असे भारताने आज स्पष्ट केले. येथे आयोजित केलेल्या परराष्ट्र धोरण परिषदेत भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी काश्‍मीर आणि पाकिस्तानबाबतची भूमिका स्पष्ट केली. 

""काश्‍मीर आणि पाकिस्तान हे दोन वेगळे मुद्दे आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये काश्‍मीर हा मूलभूत चर्चेचा अथवा वादाचा मुद्दा नाही. मात्र, पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवत आहे, हा मुख्य वादाचा मुद्दा आहे. प्रत्येकाला आपल्या शेजाऱ्यांशी चर्चा करायची इच्छा असते. मात्र, दहशतवाद पसरविणाऱ्या आणि तेच धोरण राबविणाऱ्या देशाशी आम्ही कसे बोलू?'' असा मुद्दा जयशंकर यांनी मांडला.

पाकिस्तानमधील दहशतवादी मुंबईवर हल्ला करतात, दिल्लीत संसदेवर हल्ला करतात. म्हणजेच, त्यांच्या मनात भारताविरोधात अढी आहे आणि काश्‍मीरच्या आडून ते आपला अजेंडा राबवत आहेत, असेही जयशंकर यांनी निदर्शनास आणून दिले. पाकिस्तान हा अत्यंत त्रासदायक शेजारी असल्याचेही जयशंकर यांनी सांगितले. 

काश्‍मीरमध्ये अनागोंदी होती 
भारताने पाच ऑगस्टला "कलम 370' रद्द करण्यापूर्वी काश्‍मीरमध्ये अनागोंदी होती. मात्र, येथील जनतेची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी सरकारने अत्यंत धाडसी आणि वेगळे पाऊल उचलले आहे, असे सांगत जयशंकर यांनी "कलम 370' रद्द करण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

""सरकारपुढे दोनच पर्याय होते. पहिला पर्याय म्हणजे 70 वर्षांपासून सुरू असलेले धोरण राबविणे. या धोरणाचा काहीही उपयोग नसल्याचे गेली चाळीस वर्षे आपण पाहिले. दुसरा पर्याय म्हणजे "कलम 370' रद्द करणे. सरकारने दुसरा पर्याय निवडला. काश्‍मीरमधील समस्या पाच ऑगस्टला सुरू झाल्या नाहीत, तर असलेल्या समस्या सुटण्यास सुरवात झाली आहे,'' असे जयशंकर यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com