हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे वंचित कसे? : मेहबूब शेख   - How can People roaming in Helicopters called deprived ? | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

हिवाळी अधिवेशन 14 आणि 15 डिसेंबरला मुंबईत होणार

हेलिकॉप्टरमध्ये फिरणारे वंचित कसे? : मेहबूब शेख  

सरकारनामा
शनिवार, 13 जुलै 2019

..

सोलापूर  : शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही कॉंग्रेसमधील नेते मोटारीतून फिरतात. वंचित आघाडीचे नेते मात्र हेलिकॉप्टरने फिरतात. हेलिकॉप्टरने फिरणारे वंचित कसे? असा सवाल राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला.

इव्हीएममध्ये हस्तक्षेप होत असल्याचे सांगून वंचित बहुजन आघाडीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीच्या माध्यमातून कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्‍वास कमी करण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडी करत असल्याचे आरोप ही त्यांनी विचारला.

प्रदेशाध्यक्ष शेख व कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आज सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकाऱ्यांची त्यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला शहराध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश सरचिटणीस प्रशांत बाबर, जिल्हाध्यक्ष विक्रांत माने आदी उपस्थित होते. 

भाजपकडून मिळालेल्या आर्थिक मलिद्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते डल्ला मारत असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बूथबांधणी, नवीन युवकांना पक्षासोबत जोडण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. एक बूथ, दहा युथ. माझा बूथ समतेचा दूत, अशी संकल्पना घेऊन मोहीम राबविली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख