how can i pressurized police, asks devyani farande | Sarkarnama

राज्यात भाजपचे सरकार नाही...मग मी पोलिसांवर कसा दबाव आणेल?

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

...

नाशिक : दरी- मातोरी येथील फार्म हाऊसवर डिजेवादकावरील अत्याचार प्रकरणी संदेश काजळे याला अटक करून कायदेशीर कारवाई झालीचं पाहिजे, अशी ठोस भूमिका मांडत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या प्रकरणाशी माझा संबंध जोडून विरोधक राजकारण करतं असून माझी बदनामी केली जात आहे. ज्यांच्याकडून बदनामी केली जात आहे, त्यांना कायदेशीर नोटीस बजावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरी-मातोरी येथील शिवगंगा फार्म हाऊसवर शुक्रवारी पहाटे दोन डिजेवादकांवर अमानवी अत्याचार केल्याचे प्रकरण शहरात गाजतं आहे. या प्रकरणात आमदार फरांदे यांचे नाव पुढे येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता.14) त्यांनी पत्रकार परिषद घेवून भूमिका स्पष्ट केली.

त्या म्हणाल्या, ``फार्म हाऊसवरील घटना निषेधार्ह असून पोलिसांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निष्पक्षपणे चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, गुन्हेगारांना वाचविण्यासाठी माझा दबाव असल्याचा अपप्रचार सुरु आहे. परंतू आज पर्यंत या विषयावर मी कोणालाही फोन करून दबाव आणला नाही. या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न होत आहे. ज्यांना निवडणुकीत पराभुत केले व काही लोक पडद्यामागून माझ्या विरोधात षडयंत्र रचतं आहे. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध घेताना अपप्रचार करणाऱ्यांचाही तपास करावा. निखील पवार याला आमदार फरांदे यांच्या घरातून अटक झाल्याचा आणखी एक अपप्रचार केला जात आहे. मात्र माझ्या घरातून कोणालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. निखील पवार कार्यकर्ता असल्याने त्याला ओळखते एवढेचं. राज्यात भाजपचे सरकार नाही. त्यामुळे मी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप हास्यास्पद आहे.``

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख