महाबळेश्वरात घोड्यांची उपासमार; शासनाने खुराक पुरवण्याची मागणी!

महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये घोडसवारीचा समावेश होतो. ब्रिटिश काळापासून येथे अनेक स्थानिक लोक या घोडे व्यवसायावर अवलंबून आहेत
horse association meets mahabaleshwar tahsildar and narrate problems
horse association meets mahabaleshwar tahsildar and narrate problems

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोरोनाचा फटका सर्वच घटकांना बसत असून, यातून महाबळेश्वरातील घोडे व्यावसायिक ही सुटलेले नाहीत. त्यांच्या घोड्यांची आता उपासमार होत आहे. या कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने घोड्यांना रोजचा खुराक पुरवावा, अशी मागणी महाबळेश्वर येथील घोडे व्यावसायिकांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांना दिले आहे.

महाबळेश्वर हे पर्यटनस्थळ असून येथील प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये घोडसवारीचा समावेश होतो. ब्रिटिश काळापासून येथे अनेक स्थानिक लोक या घोडे व्यवसायावर अवलंबून आहेत. येथे साधारणपणे दीडशे घोडे व्यावसायिक आहेत. या घोड्यांना रोज साधारण 250 रुपयांचा खुराक लागतो. यामध्ये कडबाकुट्टी, भुसा, चने यांचा समावेश होतो. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने येथील घोडे व्यावसायिकांची उपासमार सुरू झालेली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे खुराक होता. परंतु, आता फक्त दोन ते तीन दिवस पुरेल एवढा खुराक शिल्लक राहिला असल्यामुळे घोडे व्यावसायिकांपुढे घोड्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उभा राहिला आहे. यासाठी शासनाने निदान घोडयांच्या खुराकाची सोय करावी, अशी मागणी येथील घोडे व्यावसायिकांनी निवेदनाव्दारे केली आहे. 

तहसीलदार सुषमा चौधरी- पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले असून निवेदन देण्यासाठी येथील हॉर्स ऍन्ड पोनी असोसिएशनचे अध्यक्ष जावेद खारखंडे, बी. आय. डांगे, ताजू बढाणे व अनिस बेपारी हे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com