संजयभाऊ साॅरी; खरंच मुख्यमंत्र्यांच्या नावाने पिंपरीत लागलेत बॅनर?

..पिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला असल्याच्या बातम्या काही स्थानिक न्यूज पोर्टलवर झळकल्या असल्यातरी हा फोटो एडिट केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
flex in Pimpri
flex in Pimpri

पिंपरी - राज्यात भाजप-शिवसेना महायुतीला जनतेने स्पष्ट बहूमत देवूनही अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आडून बसली आहे. त्यांची बाजू खासदार संजय राऊत लढवत असल्याने त्यांचीच चर्चा सगळीकडे असताना, पिंपळे सौदागर येथील शिवार चौकात ‘संजय भाऊ I AM SORRY’ चा फलक झळकला असल्याच्या बातम्या काही स्थानिक न्यूज पोर्टलवर झळकल्या असल्यातरी हा फोटो एडिट केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र आहे. हा फोटो सोशल मीेडियावर प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर या फलकाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

विधानसभेचा निकाल लागून 12 दिवस उलटले. तरी, देखील भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापनेचा घोळ सुरुच आहे. भाजपवर टीका करत आहेत. शिवसेना नेते खासदार संजय राऊत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत आहेत. नेमका आज दिवसभर हा एडिट केलेला फोटो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्रासह होर्डिग्ज असलेला हा फोटो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com