गृहमंत्री अनिल देशमुखांनी मानले हेडकॉन्स्टेबलचे आभार 

कोरोनाच्या संकटात राज्यातील पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावतानाच गोरगरीबांनाही मदतीचा हात दिला आहे.
 गृहमंत्री अनिल देशमुखांनी मानले हेडकॉन्स्टेबलचे आभार 

पुणे : कोरोनाच्या संकटात लोकांनी घरी बसावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह सर्व मंत्री करीत आहेत. तरीही काही हे आवाहन गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळेच की पोलिसांनी दंडुका उचलण्यास सुरवात केली आहे.

एकीकडे पोलिसांविषयी थोडी नाराजी जरी असली तरी पोलिस आपल्या भल्यासाठीच करतात हे ही लक्षात घेणे गरजेचे आहे. 

कोरोनाच्या संकटात राज्यातील पोलिसांनीही आपले कर्तव्य बजावतानाच गोरगरीबांनाही मदतीचा हात दिला आहे. शेकडो ठिकाणी पोलिसांनी गरीबांच्या पोटाची काळजी घेत अन्नदान केले आहे. इतके सर्व करीत असताना कोरोनाच्या संकटात सरकारला मदतीचा सर्व क्षेत्रातील लोक करीत आहेत.

टाटा समुहाने तर पंधराशे कोटीचा धनादेश दिला आहे. हाच आदर्श ठेवून मुंबईतील एका पोलिस हेडकॉन्स्टेबलने दहा हजार रुपये मुख्यमंत्री निधीला दिला आहे. 

हा धनादेश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे दिला आहे. मुंबईतील डोंग्री येथील हेड कॉन्स्टेबल श्रीदर्शन बापूसाहेब डांगरे यांनी स्वत:कडील दहा हजार मुख्यमंत्री निधीला दिला. यावर गृहमंत्री देशमुख म्हणाले, की मी महाराषेट्राच्या जनतेतर्फे श्रीदर्शन डांगरे यांचे कौतुक करतानाच आभार मानतो. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com