हिंगणघाट जळीत प्रकरण - गृहमंत्र्यांनी काढली पिडीतेच्या कुटुंबियांची समजूत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून हिंगणघाट पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे
Home MInister Anil Deshmukh Telephoned Hinganghat Victim Family
Home MInister Anil Deshmukh Telephoned Hinganghat Victim Family

नागपूर : हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेचा सोमवारी सकाळी 6.55 निमिटांनी हृदयविकाराच्या झटका आल्याने मृत्यू झाला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे.

पीडिता मातोश्री कुणावार महिला कॉलेजमध्ये बॉटनी या विषयाची प्राध्यापिका होती. तीन फेब्रुवारीला नंदोरी चौकातून पायी कॉलेजमध्ये जात असताना युवकाने पेट्रोल टाकून जाळले होते. तेव्हापासून तिच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील दोन दिवसांपासून प्रकृती अधिकच खालावल्याने चिंता व्यक्‍त केली जात होती. अखेर तिची झुंज अपयशी ठरली व मृत्यू झाल्याचे डॉ. राजेश अटव यांनी प्रसारमाध्यमांना सांगितली.

दरम्यान, आमच्या मुलीने सहन केलं, मात्र आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे करा, तरच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया हिंगणघाट जळीतकांडात मृत्युमुखी पडलेल्या पीडित शिक्षिकेच्या वडिलांनी केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी येईपर्यंत पीडितेचं पार्थिव हाती न घेण्याचा पवित्रा कुटुंबीयांनी घेतला होता. आमच्या मुलीने सहन केलं, मात्र आरोपीची अवस्थाही तिच्याप्रमाणे झाली पाहिजे. त्याला जनसमुदायासमोर बाहेर काढा, त्याच्यावरही हल्ला व्हायला हवा, तेव्हाच तिच्या आत्म्याला शांती मिळेल, अशी उद्विग्नता मयत शिक्षिकेच्या वडिलांनी आमच्या कुटुंबाला मदत करावी, ही मागणी वडिलांनी सरकारकडे केली.

काय आहे हिंगणघाट जळीतकांड प्रकरण?

24 वर्षीय शिक्षिका दररोज सकाळी कामावर जाताना आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे तिचा पाठलाग करायचा. सोमवार 3 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच सकाळी 7.15 वाजताच्या सुमारास आरोपीने तिच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली होती. तिचा चेहरा जळाल्यामुळे तिच्यावर अनेक शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे. आरोपीला कठोर शिक्षा मिळावी म्हणून खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. हा खटला ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी लढवावा अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com