अखेर खुद्द गृहमंत्री अनिल देशमुखांनीच चिकण-मटण जप्त केले...

...
anil-deshmukkh-nagpur-raid
anil-deshmukkh-nagpur-raid

नागपूर : करोनाचा फैलाव रोखण्यासाठी नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सर्व बार आणि रेस्टॉरेंट बंद करण्याचे आदेश दिले असतानाही आपले कोणी काही बिघडऊ शकत नाही या थाटात सुरू असलेल्या बजाजनगर काचीपुरा येथील सुजल सावजीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी छापा मारला. येथे मोठमोठ्या गंजात शिवजलेले मटण, चिकण जप्त करण्याचे आदेश गृहमंमत्र्यांनी दिले. यासोबतच सदर येथील एका प्रसिद्ध हॉटेलवरही छापा टाकण्यात आला.

जिल्हाधिकारी ठाकरे यांनी आदेश देताच गुरूवारी सायंकाळी पाच वाजतापासून पोलिसांच्या चमूंनी सर्व रेस्टॉरेंट, बार, पानटपऱ्या बंद केल्या. बजाजनगरातील पोलिसांच्या पथकाने कारवाई केली. यानंतरही आज दिवसभर सुजल सावजी सुरू होते. अनेक ग्राहक तेथे बसले होते. सर्रासपणे त्यांना भोजन दिले जात होते. याच हॉटेलच्या शेजारी असलेल्या पान व चहा टपऱ्या पोलिसांनी दुपारी बंद केल्या. संपूर्ण परिसरात शुकशुकाट होता. हे बघता सुजल सावजीकडे पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होते.

कोणीतरी याची माहिती गृहमंत्र्यांना दिली. पोलिसांचा ताफा घेऊनच गृहमंत्री निघाले. सुजल सावजीचे सर्व साहित्य व भोजन सामग्री जप्त करण्याचे निर्देश गृहमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेस दिले. याशिवाय सदर भागातील एका प्रतिष्ठित रेस्टॉरेंटही दिवसभर सुरू होते. गृहमंत्र्यांनी धाड टाकली तेव्हा रेस्टॉरेंट बंद असून मिठाई विक्री केली जात असल्याचे सांगितले. मात्र त्याचवेळी रॅस्टॉरेंटमध्ये अनेक ग्राहक बसले होते. गृहमंत्र्यांनी काऊंटवरचे बिलांचा गठ्ठा ताब्यात घेऊन तपासला तेव्हा हॉटेल चाकल घाबरला. कारवाई करून ताबोडतोब रेस्टॉरेंट बंद करण्याचे आदेश आदेश गृहमंत्र्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com