अनिल देशमुखांनी कोरोना फैलावाची संशयाची सुई अजित डोवालांवर रोखली...

तबलिगी मरकजवरून असे राजकारण होईल, असे कोणीच अपेक्षित केले नसावे.
ajit doval ff
ajit doval ff

पुणे : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कोरोना फैलावाच्या संशयाची तबलिगी मरकजवर फिरणारी सुई राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर रोखली आहे. तबलिगीचे वसई येथे 15 व 16 मार्च रोजी होणारे संमेलन महाराष्ट्र सरकारने रोखले. मग दिल्लीमधील त्यांच्या संमेलनाला कोणी परवानगी दिली, असा सवाल देशमुख यांनी विचारला आहे. तसेच रात्री दोन वाजता डोवाल आणि तबलिगीचे मौलाना साद यांच्यात काय चर्चा झाली? या चर्चेनंतर साद फरार झाले आहेत. ते कोठे आहेत, असाही प्रश्न देशमुख यांनी विचारला आहे.

तबलिगीच्या दिल्लीतील संमलेनामुळे देशातील कोरोनाचे 30 टक्के रुग्ण तयार झाले, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात येत आहे. तसेच या संमेलनाला हजर असणाऱ्या पण पोलिसांना माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या साऱ्या परिस्थितीत आता नवीन राजकीय वळण या साऱ्या प्रकाराला मिळण्याची शक्यता देशमुख यांच्या निवेदमानुळे झाली आहे. त्यांनी थेट काही प्रश्न केंद्र सरकारला विचारले आहेत. 

त्यांच्या म्हणण्यानुसार निजामुद्दीन तबलिगी शेजारीच पोलिस स्टेशन आहे. त्या पोलिस स्टेशनला इतके लोक जमले आहेत, याची पूर्वकल्पना नव्हती का? रात्री दोन वाजता निजामुद्दीनमध्ये डोवाल गेले आणि तेथे चर्चा केल्याचे सांगण्यात येते. हे काम दिल्ली पोलिस आयुक्तांचे आहे की राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे, अशीही शंका देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ज्या प्रमाणात येथे गर्दी झाली आणि कोरोनाचा प्रसार देशभर झाला. या साऱ्या परिस्थितीला केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का, असेही त्यांनी विचारले आहे.

देशमुख यांचा सर्वाधिक आक्षेप डोवाल हे रात्री तेथे का गेले आणि त्यानंतर मौलाना सादचा तपास का लागू शकला नाही, याबाबीवर आहे. ते दोघे रात्री दोन वाजता कोणते मंत्र म्हणत होते, अशी तिरकस टिप्पणी त्यांनी केली आहे.  मरकजच्या आयोजनाची परवानगी तुमचीच. या कार्य़क्रमाला तुम्ही रोखले नाही आणि तबलिगींशी संबंध तुमचेच, असा थेट आरोप देशमुख यांनी केला आहे. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार, असे त्यांनी विचारले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com