hitendra Thakur birthday | Sarkarnama

आजचा वाढदिवस : हितेंद्र ठाकूर, आमदार, वसई-विरार

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

1988 साली वसई तालुका युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी राजकीय करिअर सुरू केले. हितेंद्र ठाकूर हे वसई-विरारचे विद्यमान आमदार आहेत. हितेंद्र ठाकूर महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. कॉंग्रेसचे व त्यानंतर अपक्ष आमदार राहिलेल्या हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाडी पक्षाची स्थापना केली. 1990 मध्ये महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ते 29 व्या वर्षी कॉंग्रेसचे वसई-विरारचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते सलग चार वेळा वसई-विरार मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले.

नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास ते प्राधान्य देत असल्यामुळे मतदारसंघात ते लोकप्रिय आहेत. त्यांची पत्नी वसई विरारच्या पहिल्या महापौर आहेत. त्यावेळी त्यांच्या पक्षाने 106 जागा जिंकल्या होत्या. माजी अपक्ष आमदार विवेक पंडित यांनी त्यांना काही काळ राजकारणात शह दिला होता. वसई-विरार या भागातील सत्ता कायम त्यांच्या आघाडीकडे आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख