माजी आमदार अपूर्व हिरे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

माजी आमदार अपूर्व हिरे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का देत माजी आमदार अपूर्व हिरे येत्या शुक्रवारी (ता.7) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत निवडक समर्थकांच्या उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा होईल. या प्रवेशाने लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने महत्वाचा डाव खेळला आहे. 

येत्या शुक्रवारी (ता.7) मुंबईत राष्ट्रवादी भवनमध्ये निवडक अनुयायांसह ते प्रवेश करणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ सूत्रांनी त्याला दुजोरा दिला. गेल्या सहा महिन्यांपासून माजी आमदार हिरे यांचा प्रवेश रखडला होता. भारतीय जनता पक्षाचे संभाव्य इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यापुर्वी त्यांचा प्रवेश निश्‍चित झाला होता. मात्र मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व अन्य नेत्यांशी सल्ला मसलत करुन तो लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा केली होती. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी त्यांची भेट घेऊन नाराजी दुर करण्याचा प्रयत्न केला होता. 

सध्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. त्यादृष्टीने खासदार संजय राऊत यांनीही हिरे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही हे शुक्रवारी होणाऱ्या प्रवेशामुळे स्पष्ट झाले आहे. डॉ. हिरे नाशिक पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार आहेत. मालेगाव बाह्य (दाभाडी) हा त्यांचा परंपरागत मतदारसंघ आहे. नाशिकच्या राजकीय घडामोडींमुळे या प्रवेशाला विशेष महत्व दिले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com