खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांसमवेत काढला `सेल्फी'

सेल्फी विथ खड्डे घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाचे (पीडब्ल्यूडी) मंत्री चंद्रकांत पाटील यांचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आयटी हब हिंजवडीत वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांसह सेल्फी घेऊन त्यांचे कौतूक केले. त्यामुळे त्यांची ही सेल्फीही चर्चेचा विषय ठरली.
खासदार सुप्रिया सुळे यांनी वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांसमवेत काढला `सेल्फी'

हिंजवडीः सेल्फी विथ खड्डे घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग व या विभागाचे (पीडब्ल्यूडी) मंत्री चंद्रकांत पाटील यांचे धिंडवडे काढणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज आयटी हब हिंजवडीत वाहतूक सुरळीत करणाऱ्या पोलिसांसह सेल्फी घेऊन त्यांचे कौतूक केले. त्यामुळे त्यांची ही सेल्फीही चर्चेचा विषय ठरली.

खड्डेमय झालेल्या राज्यभरातील खड्ड्यांबरोबर सेल्फी घेऊन ते मंत्री पाटील यांना पाठविण्याची मोहीम सुळे यांनी नुकतीच दुसऱ्यांदा सुरु केली आहे. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले असून खड्डे भरू लागले आहेत. `सेल्फी विथ खड्डे'व्दारे पीडब्ल्यूडी विभागाला लक्ष्य करणाऱ्या सुळे यांनी या सेल्फीचाच आधार घेऊन चांगले काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे कौतूकही त्यांच्याबरोबर सेल्फी काढून आज हिंजवडी दौऱ्यात केले. त्यामुळे सेल्फीव्दारे टीका करणाऱ्या सुळेंनी सेल्फीव्दारेच कौतूकही केल्याने तो चर्चेचा विषय झाला.  

पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन व त्यांच्या सहकाऱ्यांनी हिंजवडीत एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबविल्याने तेथील वाहतूक कोंडी पन्नास टक्के कमी झाली आहे. त्याबद्दल त्यांनी आयुक्त व त्यांच्या अधिकाऱ्यांचे कौतूक केले. तसेच उपस्थित पोलिस अधिकाऱ्यांबरोबर सेल्फी काढून त्याची पावतीही दिली. 

हिंजवडीतील वाहतूक कोंडीप्रश्नी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर सर्व संबधित विभागाची या आठवड्यात बैठक घेण्याची शक्यता आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून खा. सुळे यांनी आपल्या मतदारसंघातील हिंजवडीचा दौरा करून या प्रश्नाची पुन्हा एकदा पाहणी केली. माहिती घेतली. त्यांनी हिंजवडी ग्रामपंचायत कार्यालयात पीएमआरडीए,एमआयडीसी,पोलीस, वाहतूक पोलीस ,सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंजवडी ग्रामस्थ, हिंजवडी आयटी असोसिएशन तसेच आयटीयन्स यांची बैठक घेऊन आढावा घेतला. 

सुरूवातीलाच पोलिसांनी केलेल्या वाहतूक बदलाचे त्यांनी कौतुक केले. एमआयडीसीने रस्त्यांवरील अतिक्रमणाला थारा देऊ नये अशा सूचना केली. मतदारसंघातील खड्डे व अतिक्रमणे खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा दिला. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com