हिंगोली जिल्हा परिषदेत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती

हिंगोली जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहात एकही सदस्य नसलेल्या भाजपने या वेळी दहा जागांवर मुसंडी मारली. परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी 27 जागांची आवश्‍यकता असून शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांना दोन अपक्षांची गरज लागणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या आघाडीला तीनही अपक्षांचा पाठिंबा मिळविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मनधरणी करणे आवश्‍यक आहे.
 हिंगोली जिल्हा परिषदेत सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती

हिंगोली ः जिल्हा परिषद निवडणुकीत मतविभागणीचा फटका शिवसेनेला बसला असला तरी पंधरा जागा मिळवून शिवसेनाच सर्वांत मोठा पक्ष म्हणून कायम राहिला आहे. मात्र, त्रिशंकू स्थितीमुळे सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती आल्या आहेत. 
जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी 267 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. मागील सभागृहात शिवसेनेची एकहाती सत्ता होती तर भाजपला एकही जागा मिळाली नव्हती. या वेळी शिवसेना व भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर मतविभाजन टाळण्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेसची आघाडी झाली होती. या निवडणुकीत शिवसेना सत्ता राखणार का असा प्रश्‍न कायम होता. 
निवडणुकीचे निकाल जाहीर झाले, यामध्ये शिवसेनेला पंधरा जागा, राष्ट्रवादीला बारा, कॉंग्रेसला बारा, भाजपला दहा जागा तर तीन ठिकाणी अपक्ष उमेदवारांनी बाजी मारली आहे. विशेष म्हणजे मागील सभागृहात एकही सदस्य नसलेल्या भाजपने या वेळी दहा जागांवर मुसंडी मारली. जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविण्यासाठी 27 जागांची आवश्‍यकता असून शिवसेना-भाजप युती झाल्यास त्यांना दोन अपक्षांची गरज लागणार आहे. याशिवाय राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या आघाडीला तीनही अपक्षांचा पाठिंबा मिळविणे आवश्‍यक आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेसाठी अपक्षांची मनधरणी करणे आवश्‍यक आहे. त्यामुळे युती होवो अथवा आघाडी होवो सत्तेच्या चाव्या मात्र अपक्षांच्या हाती असणार आहेत. 
दरम्यान, जिल्ह्यात हिंगोली तालुक्‍यातून विठ्ठल चौतमल, कळमनुरी तालुक्‍यातील वारंगा गटातील नीलावती राजेश्‍वर पतंगे हे विजयी झाले आहेत. राजेश्‍वर पतंगे हे मागील निवडणुकीत शिवसेनेकडून विजयी झाले होते. त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. त्यामुळे आता श्री. चौतमल व श्री. पतंगे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. तर वाकोडी येथील अपक्ष उमेदवार अजित मगर हे देखील विजयी झाले आहेत. त्यामुळे या अपक्षांच्या निर्णयावरच प्रमुख पक्षांची भिस्त असणार आहे. 
निवडणुकीची वैशिष्ट्ये 
शिक्षण सभापती अशोक हरण यांचा पराभव 
अपक्ष विठ्ठल चौतमल सर्वाधिक मतांनी विजयी 
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल पराभूत 
शिरड गटातून माजी उपाध्यक्ष मिलिंद यंबल पराभूत 
शिवसेनेच्या मंगला कांबळे यांची हॅटट्रिक 
मत विभाजनाचा शिवसेनेला मोठा फटका 
भाजपच्या शून्यावरून दहा जागा 
राष्ट्रवादी व कॉंग्रेसला समान बारा जागा 
तीन अपक्ष उमेदवार विजयी 
रातोरात राष्ट्रवादीत गेलेले रामराव वागडव्ह विजयी 

हिंगोली जिल्हा परिषद 52 जागा 
शिवसेना- 15 भाजप-10 
राष्ट्रवादी- 12 
कॉंग्रेस- 12 
इतर- 3 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com