hingoli zp | Sarkarnama

हिंगोलीत आता सभापतिपदासाठी लढाई

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 24 मार्च 2017

हिंगोली ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता विविध समित्यांच्या सभापतीपदाचे वेध लागले असून राष्ट्रवादी व शिवसेनेला प्रत्येकी एक तर कॉंग्रेसला दोन सभापतिपदे दिली जाणार आहेत. आता सभापतिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. 
जिल्हा परिषदेमध्ये भाजपला एकाकी पाडण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे तिघे एकत्र आले आहेत. यामध्ये शिवसेनेच्या पंधरा, राष्ट्रवादीच्या बारा व कॉंग्रेसच्या बारा सदस्यांचा समावेश आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचे वाटप झाल्यानंतर इतर सभापतिपदे कोणत्या पक्षाला द्यावयाची यावर बोलणी झाली होती. त्यानंतरच या तीन पक्षांची युती झाली आहे.

दरम्यान,अध्यक्षपदी शिवसेनेच्या शिवराणी नरवाडे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांची निवड झाली आहे. आधी ठरल्यानुसार कृषी सभापतिपद राष्ट्रवादीला मिळणार असून, समाज कल्याण व शिक्षण सभापतिपद कॉंग्रेसला दिले जाणार आहे. महिला बाल कल्याण सभापतिपद शिवसेनेकडे दिले जाणार असल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेच्या सभापतिपदाच्या वाटपावर एकमत झाले आहे. मात्र, तूर्तास उपाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडल्यामुळे नाराज झालेले राष्ट्रवादीचे प्रल्हाद राखोंडे यांच्याकडे कृषी सभापतिपद दिले जाण्याची शक्‍यता आहे. या शिवाय कॉंग्रेसकडून समाज कल्याण सभापतिपद डॉ. सतीश पाचपुते यांना दिले जाईल तर शिक्षण सभापतिपदाच्या नावाबाबत अद्यापही निर्णय झाला नाही. शिक्षण सभापतिपदावर वर्णी लागण्यासाठी कॉंग्रेसच्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांकडे लॉबिंग सुरू केल्याचे चित्र आहे.

शिवसेनेच्या वाट्याला आलेले महिला व बालकल्याण सभापतिपद रूपालीताई पाटील गोरेगावकर यांना दिले जाण्याचे संकेत आहेत. सध्या तरी तीनही पक्षांकडून अंतर्गत बैठकांना सुरवात झाली असून पुढील काही दिवसांतच सभापतिपदाच्या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख