hingoli zp | Sarkarnama

निवडणुकीच्या परीक्षेत शिक्षण सभापती नापास

सरकारनामा ब्युरो 
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

हिंगोली ः जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काही गटांमधून धक्कादायक निकाल लागले असून निवडणुकीच्या या परीक्षेत बासंबा गटातून शिक्षण सभापती नापास झाले आहेत. या ठिकाणी शिवसेनेच्याच बंडखोर उमेदवाराने त्यांचा पराभव केला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतमोजणीनंतर आता जय पराजयाचे कवित्व सुरू आहे. प्रत्येक उमेदवार त्यांना कोणत्या केंद्रावर जास्त मते मिळाली, कोणत्या केंद्रावर कमी मते मिळाली, याची माहिती घेत त्याची कारणेही शोधत आहेत. निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का देत नवख्या उमेदवारांनी बाजी मारली आहे. त्यामुळे या निवडणुकीची चर्चा अद्यापही सुरूच आहे. 

हिंगोली तालुक्‍यातील बासंबा गटातील लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या गटातून शिक्षण सभापती अशोक हरण यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे मागील चार महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेले शिवसेनेचेच विठ्ठल चौतमल यांनी बंडखोरी करून अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. मागील चार महिन्यांपासून तयारी करणाऱ्या श्री. चौतमल यांना मागील निवडणुकीत पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांनी जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न थांबविले नाही.

त्यामुळे या वेळी त्यांना मतदारांची मोठी सहानुभूती मिळाली आहे. काही गावकऱ्यांनी त्यांच्यासाठी वर्गणीही गोळा करून निवडणुकीचा खर्च केला आहे. तर काही गावांतून श्री. चौतमल यांच्या प्रचारासाठी येणाऱ्या समर्थकांची गावकऱ्यांनी भोजनाची व्यवस्था केली होती. 
या निवडणुकीत झालेल्या एकूण नऊ हजार 265 मतदानांपैकी तब्बल चार हजार 608 मतदान श्री. चौतमल यांना मिळाले आहे. म्हणजेच एकूण मताच्या 49.73 टक्के मतदान श्री. चौतमल यांना मिळाले आहे. तर उर्वरित उमेदवारांमध्ये शिक्षण सभापती श्री. हरण यांना एक हजार 893, विनोद नाईक यांना 823, विजयेंद्र ढाले यांना एक हजार 40 तर ज्ञानेश्‍वर जगताप यांना 715 मते मिळाली आहेत.

या धक्कादायक निकाला सोबतच आता श्री. चौतमल हे कोणाच्या पारड्यात आपले वजन टाकणार यावर जिल्हा परिषदेच्या सत्तेचे राजकारण अवलंबून राहणार आहे, हे विशेष. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख