Hingoli Shivsena Protest Against Fuel Hike | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

हिंगोलीत शिवसेनेचा गाढव मोर्चा ; इंधन दरवाढीचा निषेध

मंगेश शेवाळकर
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता.१९) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

हिंगोली : शहरामधे शिवसेनेच्या वतीने बुधवारी (ता.१९) सकाळी गाढव मोर्चा काढून इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. देशात इंधनाचे दर वाढल्यामुळे सर्व सामान्यांना मोठा फटका बसत आहे. वाहनांधे पेट्रेल, डिझेल भरणेही कठीण झाले असून त्यामुळे वाहने घरासमोरच उभी ठेवावी लागत आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या कुचकामी धोरणाचा फटका नागरीकांना बसू लागला आहे. या इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शिवसेनेने बुधवारी (ता.१९) महात्मा गांधी चौकातून गाढव मोर्चा काढला. 

यावेळी दोन गाढवांच्या गळ्यात भाजपाचा रुमाल काढून शहरातील मुख्यमार्गावरून फिरविण्यात आले. यावेळी दुचाकी वाहन बैलगाडीत ठेवण्यात आले होते. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संतोष बांगर, युवासेनेचे जिल्हा प्रमुख दिलीप घुगे, राजेश पाटील गोरेगावकर, पदाधिकारी राम कदम, नगरसेवक सुभाष बांगर, बाजार समितीचे माजी सभापती रामेश्वर शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मगर, फकीरराव मुंडे, नंदकिशोर खिल्लारे, सखाराम उबाळे, संतोष गोरे, गणेश शिंदे, प्रकाश घुगे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. या आगळ्या वेगळ्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा सुरु होती. 

इंधन दरवाढ हा शासनाचा गाढवपणा
देशात दररोज होणारी इंधन दरवाढ शासनाचा गाढवपणा आहे. एकीकडे अच्छेदिनचे स्वप्न दाखवायचे अन दुसरीकडे दरवाढ  करायची असे धोरण सरकारचे आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपाला गाढवपणा भोवणार आहे - संतोष बांगर, जिल्हा प्रमुख
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख