हिंगोलीत शिवसेनेचे "कर्जमुक्‍ती अभियान' जोरात सुरू

कळमनुरी : शिवसेनेच्या कर्जमुक्‍ती अभियानाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी मार्गदर्शन केले.
कळमनुरी : शिवसेनेच्या कर्जमुक्‍ती अभियानाच्या बैठकीत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी मार्गदर्शन केले.

हिंगोली : "मी कर्जमुक्‍त होणारच' हे अभियान शिवसेनेने जिल्हाभरात शेतकऱ्यांसाठी सुरू केले असून अभियानासाठी मागणीपत्रे भरून घेण्यासाठी तालुक्‍यांमध्ये बैठका सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे या मागणीपत्रात प्रिय देवेंद्रभाऊ, कोपरापासून दंडवत या शब्दात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.

शिवसेनेच्या वतीने कर्जमुक्‍ती अभियान सुरू झाले असून शेतकऱ्यांच्या सह्या व कर्जाचा तपशील पत्रावर भरून घेतला जात आहे. पत्राच्या सुरुवातीला प्रिय देवेंद्र भाऊ कोपरापासून दंडवत अशी सुरुवात केली असून शेतकरी तक्रार करायला गेले तर पोलिस मारतात असे म्हटले आहे.

कर्ज फेडण्यासाठी शेतमालाला भाव तर मिळायला हवा. पोरींची लग्न खोळंबली, पोराच्या कॉलेजची फी देता येईना. बॅंकांनी घरावर नोटिसा चिटकवल्या. तुमच्याकडे आलो तर साल्यांनो रडतात कशाला अशी उत्तरे दिली जातात. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांचीच जुनी भाषणे ऐकून न्याय द्यावा, असे या पत्रात म्हटले आहे.

याशिवाय शेतकऱ्यांना बारा प्रश्न विचारले आहेत. तुम्ही सुखी आहेत का, शेतीशिवाय इतर उत्पन्नाची साधने, पीकविमा योजनेचा लाभ झाला का, कर्जाचा भार आहे का, मनात आत्महत्येचा विचार येतो का, नोटबंदीचा फायदा झाला का, शेततळे मिळाले का, लोडशेडिंग सुरू आहे का, शेतीमालाला हमीभाव आहे का, पीकविमा योजनेचा हप्ता कोण भरते असे प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत. 
कळमनुरीत अभियानाची बैठक 
कळमनुरी : मी कर्जमुक्‍त होणार या शिवसेनेच्या शेतकरी कर्जमुक्‍त अभियानांतर्गत शुक्रवारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन तालुक्‍यातील दहा हजार शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या नावे कर्जमुक्‍तीचे संकल्पपत्र संकलित करून पाठवण्याचे ठरवण्यात आले. या वेळी शिवसेनेतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्‍तीसाठी मी कर्जमुक्‍त होणारच या अभियानाची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी दिली.

तालुक्‍यातील दहा हजार शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या नावे संकल्पपत्र भरून सर्व पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. पक्ष कार्यकर्त्यांनी छापील स्वरुपातील ही पत्रे भरून घेण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com