हिंगणघाट : आरोपीला ताब्यात द्या म्हणत नागरिकांनी रोखला नागपूर-हैदराबाद महामार्ग

माझ्या मुलीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. त्यालाही तशाच वेदना झाल्या पाहीजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली.
Hinganghat erupts as burn victim dies in nagpur   
Hinganghat erupts as burn victim dies in nagpur   

नागपूर - माझ्या मुलीचा सात दिवसांनी मृत्यू झाला. आता आरोपीला आमच्या ताब्यात द्या व आमच्या समोर जाळा. त्यालाही तशाच वेदना झाल्या पाहीजे, अशी संतप्त प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली.

हिंगणघाट जळीत कांडातील पिडीतेची झुंज आज पहाटे संपली. पण तेव्हापासून गावकऱ्यांचा संताप उफाळायला सुरुवात झाली. हा संताप इतका प्रचंड वाढला की, आरोपी विकेश नगराळेला आमच्या ताब्यात द्या म्हणत गावकऱ्यांनी पिडीतेच्या नागपूर-हैदराबाद महामार्गावरी दारोडा गावानजिक वाहतूक रोखून धरली. दुतर्फा जवळपास दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका संतप्त गावकऱ्यांनी घेतल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे.

गावकऱ्यांना महामार्गावर एकत्र येत महामार्ग रोखला. यावेळी पोलीसांसोबतही त्यांची बाचाबाची, वादावादी झाली. त्यामुळे महामार्गावर दारोड्यानजिक तणावाचे वातावरण आहे. सकाळी 11 वाजतापासूनच हा महामार्ग बंद असल्याची माहीती आहे. 
आरोपीला फाशी झाली पाहीजे, त्याला आमच्या ताब्यात द्या. त्या नराधमाला जिवंत जाळू, अशा संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. आज सकाळपासून दरोडा चौका-चौकात बंद पाळण्यात आला. शाळा, महाविद्यालय व व्यापारी प्रतिष्ठानही बंद ठेवण्यात आली. चौका-चौकात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. जवळपास तीनशे पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 
संतप्त नागरिकांनी एकत्र येत नारेबाजी केली. अंकिताला न्याय मिळालाच पाहीजे, आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे, "जाळून टाका जाळून टाका' अशा घोषणा संतप्त नागरिक देत आहेत

न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही
सरकारकडून योग्य ती मदत व आरोपीला फाशी मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या वडिलांनी दिली होती. यांनतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोन करून पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले आणि भावाला नोकशी देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, संतप्त गावकऱ्यांनी न्याय मिळाल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका घेतल्याने तणावात आणखीनच भर पडली आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com