हिना रब्बानी खर यांनी ओकली गरळ; म्हणे `मोदींचा आजचा भारत भांडखोर'

पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटच्या जंगलातील टेकडावरील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण अड्डा भारताच्या हवाई दलाने उडावल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
हिना रब्बानी खर यांनी ओकली गरळ; म्हणे `मोदींचा आजचा भारत भांडखोर'

पुणे - पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटच्या जंगलातील टेकडावरील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण अड्डा भारताच्या हवाई दलाने उडावल्यानंतर पाकिस्तानातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  भारताच्या हल्लाने पाकिस्तानात आणीबाणीची स्थिती निर्माण झाल्याचे या राजकीय नेत्यांचे मत आहे. 

मोदींवर टीका करण्याचा एककलमी कार्यक्रम तेथील राजकीय नेत्यांनी, पक्षांनी सुरू केला आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये बालाकोट हल्ल्यामुळे गरमागरम चर्चा झाली. यामध्ये पाकच्या माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी खर यांनी बोलताना मोदींवर टोकाची टीका केली. 

आजचा `भांडखोर भारत' हा `मोदींचा भारत' आहे, अशी गरळ ओकत हिना रब्बानी खर यांनी भारतील मॉब लिचिंगचा उल्लेख केला. `भारतात गायांसाठी माणसांना मारले जाते' असे सांगत हा आजचा मोदींचा भारत असल्याचे खर यांनी नमूद केले. भारताच्या हल्लामुळे सध्या पाकिस्तानमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली असून, तत्काळ पाकिस्तान संसदेचे अधिवेशन बोलवावे आणि त्यावर चर्चा करावी, अशी मागणी खर यांनी केली.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन (ओआयसी) च्या परिषदेच्या उद्घाटनाला भारताला निमंत्रित करण्यात आले आहे. यावरही आजच्या संसदेतील चर्चेत आक्षेप घेण्यात आला. भारताला दिलेले निमंत्रण रद्द करण्याची मागणीही खर यांनी केली.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com