खासदार हिना गावित विवाहबंधनात अडकणार

डॉ. वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. ते एम.एस. असून मुंबईत ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.
hina gavit engagement ceremony
hina gavit engagement ceremony

नंदुरबार : नंदुरबारच्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार डॉ. हिना गावित या मुंबईस्थित डॉ. तुषार वळवी यांच्याशी विवाहाबध्द होत असून त्यांचा साखरपुडा आज (ता.26) येथे झाला.

डॉ. वळवी हे वैद्यकीय पदव्युत्तर असून ते मूळचे हातधुई (ता. धडगाव जि. नंदुरबार) येथील आहेत. ते एम.एस. असून मुंबईत ते वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत.

खासदार डॉ. हिना गावित यांचे शिक्षण एमबीबीएस एमडी झाले आहे. त्यांचे वडील माजी मंत्री व व विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित आहेत. डॉ. हिना या वैद्यकीय शिक्षण घेत असताना, त्यांनी प्रारंभी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या समवेत राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या माध्यमातून कार्य केले. मार्च 2014 मध्ये दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला व प्रथमच नंदुरबार लोकसभा निवडणूक लढवली आणि त्यांनी कॉंग्रेसचे सलग नऊ वेळा खासदार राहिलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा दणदणीत पराभव करीत त्या 'जाएंट किलर' ठरल्या. तसेच त्या सर्वात तरुण आणि उच्च शिक्षित खासदार ठरल्या. त्यानंतर सलग दुसऱ्यांदा 2019 मध्ये त्या भाजपकडून खासदार म्हणून निवडून आल्या.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com