himanshu roy suicides | Sarkarnama

तब्येतीबाबत जागरूक असलेल्या IPS हिमांशू राॅय यांची आत्महत्या चटका लावणारी

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 11 मे 2018

पुणे : आयपीएल स्पाॅट फिक्सिंगचा तपास करणारे, कसाबला मुंबईच्या तुरुंगातून येरवडा तुरुंगात गोपनीयरित्या पोचविणारे, बाॅडिबिल्डर समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू राॅय यांनी एका दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या तोंडात गोळी झाडून घेतली.

पुणे : आयपीएल स्पाॅट फिक्सिंगचा तपास करणारे, कसाबला मुंबईच्या तुरुंगातून येरवडा तुरुंगात गोपनीयरित्या पोचविणारे, बाॅडिबिल्डर समजले जाणारे राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक आणि माजी एटीएस प्रमुख हिमांशू राॅय यांनी एका दुर्धर आजाराला कंटाळून आत्महत्या केली. त्यांनी स्वतःच्या तोंडात गोळी झाडून घेतली.

स्वतःच्या तब्येतीबद्दल आणि आहाराबद्दल नेहमीच जागरूक असणारे राॅय हे पोलिस दलातील अनेकांसाठी अनुकरणीय ठरले होते. त्यांची तब्येत एखाद्या बाॅडिबिल्डर प्रमाणे होते. त्यासाठी ते मेहनतही खूप घेत होते. अशा व्यक्तीनेच आत्महत्या करावी, याचा अनेकांना धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी त्यांना कर्करोगाचे निदान झाले. या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जाते.  त्यांना तातडीने बॉम्बे रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. त

त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. राॅय हे दीर्घ काळ मुंबई पोलिसांच्या गुन्हा शाखेचे सहआयुक्त होते. त्यामुळे त्यांनी अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला. पत्रकार जे डे यांच्या हत्येचाही तपास त्यांच्या नेतृत्त्वाखाली झाला होता. या गुन्ह्यात कुख्यात गुंड छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा नुकतीच सुनावली. ते १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. त्यांनी नाशिक येथे आय़ुक्त तसेच नगर येथे पोलिस अधीक्षक म्हणून विविध ठिकाणी काम पाहिले होते.  

ज्येष्ट वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांचे वर्णन कार्यक्षम व कर्तबगार अधिकारी म्हणून केेल. ते तब्येतीबाबत नेहमीच जागरूक असत. आपल्या हाताखालील कर्माचाऱ्यांनाही ते आरोग्याचा सल्ला देत. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात जिवंत पकडलेला दहशतवादी कसाब याला मुंबई येथील तुरुंगातून येरवडा तुरुंगात फाशी नेण्यासाठी हलवायचे होते. हे सारे अाॅपरेशन राॅय यांनी कोणालाही खबर लागू न देता पार पाडले, अशी आठवण निकम यांनी सांगितली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख