स्पॅनिश फ्लू, दुसरे महायुद्ध यातून वाचल्या...पण 109 व्या वर्षी कोरोनाने गेल्या...

१०८ वर्ष निरोगी आयुष्य जगलेली ब्रिटनची हिल्डा चर्चिल लवकरच आपला १०९ वाढदिवस साजरा करणार होती. ती स्वतः आणि तिच्या कुटुंबियांनी वाढदिवसाची तयारी केली होती. ५ कोटी लोकांचा बळी घेणाऱ्या १९१८ च्या स्पॅनीश फ्लू मधूनही हिल्डा वाचली होती. दोन महायुद्ध तिने पाहीले होते. पण कोरोनासोबतची लढाई अवघ्या काही तासांतच ती हरली. गेल्या शनिवारी तिचा मृत्यू झाला.
hilda churchill could have celebrate 109 next week but dies due to COVID19
hilda churchill could have celebrate 109 next week but dies due to COVID19

नागपूर ः १०८ वर्ष निरोगी आयुष्य जगलेली ब्रिटनची हिल्डा चर्चिल लवकरच आपला १०९ वाढदिवस साजरा करणार होती. ती स्वतः आणि तिच्या कुटुंबियांनी वाढदिवसाची तयारी केली होती. ५ कोटी लोकांचा बळी घेणाऱ्या १९१८ च्या स्पॅनीश फ्लू मधूनही हिल्डा वाचली होती. दोन महायुद्ध तिने पाहीले होते. पण कोरोनासोबतची लढाई अवघ्या काही तासांतच ती हरली. गेल्या शनिवारी तिचा मृत्यू झाला. 

येत्या ५ एप्रिलला आम्ही तिचा वाढदिवस साजरा करणार होतो. त्यासाठी आम्ही सर्व आणि हिल्डा स्वतः खुप उत्साहीत होतो. पण कोरोनाने घात केला, असे तिचा नातू अॅन्थनी चर्चिल याने म्हटले. गेल्या आठवड्यात मंगळवारी संशयीत म्हणून तिचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. शनिवारी त्याचा रीझल्ट पाॅझीटीव्ह आला आणि त्यानंतर पाच तासांतच हिल्डाचा मृत्यू झाला. तिच्या अंतिम समयी आम्ही तिच्या जवळ नव्हतो. याचे आम्हाला अतिव दुःख झाले असल्याचेही अॅनथनी म्हणाला. 

सन १९१८ मध्ये स्पॅनीश फ्लू ने जगभरात पाच कोटी लोकांचे बळी घेतले होते. यामध्ये हिल्डाची एक वर्षीय बहीणदेखील मरण पावली होती. लढवय्यी हिल्डा मात्र त्यातून सुखरुप बचावली. आपल्या आयुष्यात तिने दोन महायुद्धांसह अनेक संकटे बघितली आणि जिद्दीने लढली. कोरोनासोबती लढाई मात्र ती हरली. १९१८ नंतर जागतिक मंदीच्या काळात हिल्डा स्पेनमधून सॅलफोर्डला आली होती. तेथे शिवणकाम करुन ती आपला उदरनिर्वाह चालवित असे. 

उपलब्ध आकडेवारीनुसार, कोरोनाने युकेमध्ये आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिक लोकांचा बळी घेतलेला आहे आणि १७ हजारपेक्षा अधिक लोक कोरोनाने बाधित आहेत. जगभरात कोरोनाने मरणाऱ्यांमध्ये हिल्डा चर्चिल आतापर्यंतची सर्वात वयोवद्ध महिला ठरली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com