Hikmat Udhan says he will stay in Ghansawangi | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

मलबार हिल मतदार संघात भाजप चे मंगल प्रभात लोढा आघाडीवर
तिसऱ्या फेरीत शिवसेनेचे आदित्य ठाकरे 16 हजार मतांनी आघाडीवर
नागपूर - दक्षिण पश्चिम मतदार संघ : पाचव्या फेरीत मुख्यमंत्री 11084 मतांनी पुढे
चंद्रकांत पाटील यांना सहाव्या फेरीअखेर ११ हजार, ५६५ मतांची आघाडी
मुक्ताईनगर सहाव्या फेरीत रोहिणी खडसे 2633 मतांनी पुढे
ऐरोली - गणेश नाईक 16308 मतांनी आघाडीवर
कणकवली विधानसभा मतदारसंघात नितेश राणे यांची आघाडी कायम आठव्या फेरीअखेर 12915 मतांची आघाडी
बारामतीत सहाव्या फेरी अखेर अजित पवार 35578 मतांनी आघाडीवर
भोसरी विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या फेरी अखेर महेश लांडगे १२ हजार ७१९ मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघ उदयनराजे भोसले दुसऱ्या फेरीत 10500 हजार मतांनी पिछाडीवर
सावंतवाडी शिवसेनेनेचे दीपक केसरकर दुसऱ्या फेरीत 703 मतांनी आघाडीवर
कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
सातारा : सातारा विधानसभा भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आघाडीवर
भोकर मतदारसंघात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण आघाडीवर
भुसावळला पहिल्या फेरीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांना 3960 मतांची आघाडी.
इंदापूर हर्षवर्धन पाटील 1000 मतांनी आघाडीवर
राज्यात मतमोजणीला सुरुवात

मुंबईचं पार्सल आता घनसावंगीतच राहणार  : डॉ. हिकमत उढाण 

डॉ. माधव सावरगावे 
गुरुवार, 10 ऑक्टोबर 2019

तिर्थपुरी ते अंतरवाली या रस्त्यावर इथेनॉल आणि डीस्टीलरी निर्मिती करण्याचा कारखाना उभारणार आहे. त्यासाठी केंद्राची परवानगीही मिळाली आहे. -डॉ. हिकमत उढाण

घनसावंगी : 'सध्या मुंबईचं पार्सल मुंबईला परत पाठवून देऊ, असा विरोधकांकडून प्रचार केला जातोय. मी जरी मी पराभूत झालो तरीही घनसावंगी सोडून जाणार नाही, येथेच राहणार, ' असा खुलासा करीत मतदारसंघाच्या २० वर्षांपासून रखडलेल्या कामासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मला संधी द्या, असं शिवसेनेचे घनसावंगी मतदारसंघाचे उमेदवार डॉ. हिकमत उढाण यांनी आवाहन केले.

आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मराठवाड्यातली पहिली सभा जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत डॉ. हिकमत उढाण यांनी ऊसावर प्रक्रिया करण्यात येणाऱ्या नव्या कारखान्याची सुरुवात करण्यात आल्याचे सांगितले. 

डॉ. उढाण म्हणाले, 'घनसावंगी मतदारसंघात ऊसाचा मोठा प्रश्न आहे. या ऊसाचा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी एक कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न होता. मात्र, त्याच्या परवानगीसाठी अडचणी येत होत्या. कारण साखर कारखाना उभारताना १५ किलोमीटरच्या अंतरात दुसरा साखर कारखाना नको होता. मात्र, इथे जवळ अनेक कारखाने असल्याने ते जमत नव्हते. त्यामुळे साखर निर्मिती न करता तिर्थपुरी ते अंतरवाली या रस्त्यावर इथेनॉल आणि डीस्टीलरी निर्मिती करण्याचा कारखाना उभारणार आहे. त्यासाठी केंद्राची परवानगीही मिळाली आहे. या नव्या कारखान्याचे उदघाटन निवडणूक झाल्यानंतर करण्यात येईल'. 

चिखलामुळे दोघांना  अवघड 
सध्या जोरात पाऊस पडतोय. या पावसामुळे घनसावंगी मतदारसंघातील रस्ते उघडे पडलेत. रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्यासाठी विद्यमान आमदारांनी (राजेश टोपे) मुरूम टाकले. पुन्हा पाऊस झाल्याने त्या मुरमाचा चिखल झाला. आणि आता प्रचार करताना माझी आणि त्यांचीही अडचण झाली. कारण त्या चिखलातून गावागावात जायला गाडीच नसल्याचं डॉ. उढाण यांनी सभेत सांगितले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख