खासदार धोत्रे, धानोरकर यांच्या विरोधातील इलेक्शन पिटिशन न्यायालयाने फेटाळले 

दाखल करण्यात आलेली याचिका लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार नसून याचिका दाखल करण्यामागे कुठलेही कारण आढळून येत नाही.
sanjay-Dhotre- Balu Dhanorkar election petition rejected
sanjay-Dhotre- Balu Dhanorkar election petition rejected

नागपूर  : अकोल्याचे खासदार, केंद्रीय मंत्री संजय धोत्रे व चंद्रपूरचे खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांच्या विरोधातील निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने फेटाळली. त्यामुळे, खासदार धोत्रे, धानोरकर यांना दिलासा मिळाला आहे. संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्‍वर सुलताने यांनी आणि बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित आघाडीचे उमेदवार ऍड. राजेंद्र महाडोळे यांनी ही याचिका दाखल केली होती.

याचिकाकर्त्यांनुसार, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झाला असून राजुरा विधानसभा क्षेत्रामधून 672 मतांची तफावत आढळून आली आहे. त्याचा फायदा विजयी उमेदवारास  झाला असा दावा केला केला होता .  

याशिवाय, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या तफावतीचे निराकरण करताना निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या सूचनांचे आणि कायद्यातील तरतुदींचे पालन केले नाही. त्यामुळे, संजय धोत्रे व बाळू धानोरकर यांची निवड रद्द करीत ते बेकायदेशीरपणे निवडून आले, असे जाहीर करावे आणि पुन्हा निवडणूक घ्यावी, अशी विनंती याचिकेतून करण्यात आली.

मात्र, याचिकेतून निवडून आलेल्या उमेदवारावर एकही आरोप करण्यात आलेला नाही. त्यांनी निवडणुकीमध्ये कोणते गैरकृत्य केले, याचा उल्लेखसुद्धा त्यामध्ये नाही. तसेच, दाखल करण्यात आलेली याचिका लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार नसून याचिका दाखल करण्यामागे कुठलेही कारण आढळून येत नाही.

 त्यामुळे, सदर याचिका खारीज करून याचिकाकर्त्याला दंड ठोठावण्यात यावा, अशी विनंती बाळू धानोरकर यांच्यातर्फे बाजू मांडताना ऍड. अनील ढवस यांनी उच्च न्यायालयाला केली. सर्व पक्षाच्या बाजू लक्षात घेतल्यानंतर नागपूर खंडपीठाने ही याचिका खारीज केली. 

याचिकाकर्त्यातर्फे ऍड. निहालसिंग राठोड यांनी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांतर्फे सरकारी वकिल सुमन देवपुजारी यांनी, निवडणूक आयोगातर्फे ऍड. नीरजा चौबे यांनी बाजू मांडली. तर, बाळू धानोरकर यांच्यातर्फे ऍड. अनिल ढवस यांनी बाजू मांडली. त्यांना ऍड. त्रिशुल पांडे व ऍड. श्रीकांत बावनथडे यांनी सहकार्य केले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com