High Court Bench Serves notice to Parriakrs Son | Sarkarnama

नेत्रावली इको-टुरिझम प्रकल्पप्रकरणी पर्रिकरांच्या मुलाला खंडपीठाची नोटीस

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे.

पणजी : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.

नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व इतरांनी ही जनहित याचिका सादर केली आहे. ही याचिका आज खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणीसाठी आली असता सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावून त्यावरील सुनावणी 11 मार्चला ठेवण्यात आली. या प्रतिवाद्यांमध्ये अभिजात पर्रीकर यांच्यासह वन खाते, गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, नेत्रावली पंचायत, नगर नियोजक, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र देखरेख समिती यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

ज्या क्षेत्रात हा ईको टुरिझम प्रकल्प उभा राहत आहे त्याचा भाग वन्यप्राणी अभयारण्याच्या सीमापासून एक किलोमीटर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असल्याने त्याला दिलेली परवानगी बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख