नागपुरात कॉंग्रेस नेत्यांवर हायकमांडचा  'वॉच' : शहराध्यक्ष ठाकरे 

पक्षातील अशा संशयास्पद नेत्यांची यादीच तयार केली असल्याचे त्यांनी नमुद केले.
NAgpur-Thakare.
NAgpur-Thakare.

नागपूर :  शहरातील कॉंग्रेस नेते कुठे जातात, कुणाला भेटतात, यावर नजर ठेवण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे एक पथक येणार असल्याचे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज सांगितले. पक्षातील अशा संशयास्पद नेत्यांची यादीच तयार केली असल्याचे त्यांनी नमुद केले. 

नागपुरात कॉंग्रेसमधील गटबाजी सर्वश्रूत आहे. काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याची माहीती आम्हाला आहे. त्यामुळे असे नेते भाजपचे काम करतील अशी शंका आहे. असे नेते काय करतात, कोठे जातात, कुणाला भेटतात यावर वॉच ठेवण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे पथक महीनाभर येथे ठाण मांडून बसणार असल्याचे ठाकरे म्हणाले.

 त्यांच्या या विधानामुळे कॉंग्रेस नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. कॉंग्रेसचे काही नेते गडकरींकडे वेगवेगळ्या कामांनी जात असतात. खुद्द नितीन गडकरींनी तसा खुलासाही यापुर्वी केलेला आहे. त्यामुळे असे नेते कॉंग्रेसचे काम करतील की नाही, अशी आम्हाला शंका असल्यामुळे हे पथक महीनाभर वॉच ठेवणार असल्याचे ते म्हणाले. नाना पटोले यांचे काल रेल्वे स्थानकावर सर्वांनीच उत्साहात भव्य स्वागत केले. नाना सर्वमान्य नेते असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com