आजचा वाढदिवस : नगरसेवक हेमंत रासने, भाजप पुणे महापालिका - hemant rasane pmc | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस : नगरसेवक हेमंत रासने, भाजप पुणे महापालिका

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गेले तीन टर्म नगरसेवक असलेल्या हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेत स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. यावेळी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद हवे होते. मात्र सदस्यत्वापासून दूर ठेवण्यात आल्याने अध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्न ते गेली काही वर्षे बाळगून आहेत. कसबा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील प्रभागातून 2002 त्यानंतर 2012 व 2017 या तीन निवडणुकात रासने कोणत्याही अडचणीविना निवडून आले आहेत. गेल्या 25 वर्षे पालकमंत्री गिरीश बापट या मतदारसंघाचे नेत्वृत्व करीत आहेत.

गेले तीन टर्म नगरसेवक असलेल्या हेमंत रासने यांनी पुणे महापालिकेत स्थायी समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. यावेळी त्यांना स्थायी समितीचे अध्यक्षपद हवे होते. मात्र सदस्यत्वापासून दूर ठेवण्यात आल्याने अध्यक्ष होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार होण्याचे स्वप्न ते गेली काही वर्षे बाळगून आहेत. कसबा हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या मतदारसंघातील प्रभागातून 2002 त्यानंतर 2012 व 2017 या तीन निवडणुकात रासने कोणत्याही अडचणीविना निवडून आले आहेत. गेल्या 25 वर्षे पालकमंत्री गिरीश बापट या मतदारसंघाचे नेत्वृत्व करीत आहेत. भविष्यात या मतदारसंघातून आपणास संधी मिळेल, अशी आशा बाळगून अनेकजण आहेत. त्यात रासने हे आघाडीवर आहेत. रासने यांचा राज्य पातळीवरील नेत्यांची चांगला संपर्क असल्याने कसब्यातून ते आशावादी आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख