तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रासनेंच्या गळ्यात स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ

पुन्हा सत्तेत यायचे असेल तर उरलेल्या अडीच वर्षात पक्षाला प्रचंड काम करावे लागणार आहे. गेल्या अडीच वर्षात महापालिकेच्या पातळीवर छाप पाडण्यासारखे काम महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून अजून झालेले नाही. राज्यात सत्ता बदल झाल्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेत भाजपाची भक्कम सत्ता आहे. तब्बल 99 नगरसेवक आहेत.त्यामुळे अडीच वर्षात भक्कम काम करून दाखविले तरच भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. या पार्श्‍वभूमीवर हेमंत रासने यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.
 तीन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रासनेंच्या गळ्यात स्थायीच्या अध्यक्षपदाची माळ

पुणे : महापालिकेत सत्ता आल्यापासून सलग तीन वर्ष स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर डोळा ठेवून असलेल्या नगरसेवक हेमंत रासने यांच्या गळ्यात अखेर या अध्यक्षपदाची माळ पडली. हे पद घेताना रासनेंना "बोनस'ही मिळाली असून, रासने यांच्याकडे पुढची तेरा महिने हे पद राहणार आहे. त्यामुळे रासन यांना महापालिकेचे दोन अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळणार आहे. 

स्थायी समितीच्या आज झालेल्या निवडणुकीत रासने यांना 10 तर राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व शिवसेना आघाडीच्या अशोक कांबळे यांना सहा मते मिळाली. स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे आमदार म्हणून निवडून आल्याने त्यांनी या पदाचा राजीनामा दिला आहे. कांबळे यांच्या जागी रासने यांनी निवड झाली आहे. महापालिकेच्या सत्तेत ही दोन्ही महत्वाची आहेत. राज्यातून भाजपाची सत्ता गेली आहे. त्यामुळे महापालिकेची उर्वरित अडीच वर्षे पक्षासाठी महत्वाची आहेत. पुन्हा सत्तेत यायचे असेल तर उरलेल्या अडीच वर्षात पक्षाला प्रचंड काम करावे लागणार आहे. गेल्या अडीच वर्षात महापालिकेच्या पातळीवर छाप पाडण्यासारखे काम महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून अजून झालेले नाही. राज्यात सत्ता बदल झाल्याचा परिणाम महापालिकेच्या कामकाजावर होण्याची शक्‍यता आहे. महापालिकेत भाजपाची भक्कम सत्ता आहे. तब्बल 99 नगरसेवक आहेत.त्यामुळे अडीच वर्षात भक्कम काम करून दाखविले तरच भाजपाला पुन्हा सत्तेत येण्याची संधी आहे. या पार्श्‍वभूमीवर हेमंत रासने यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com